दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटात तो जगविख्यात बॉक्सर माईक टायसनसोबत (Mike Tyson) भूमिका साकारताना दिसणार आहे. माईक टायसनच्या वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. विजयची हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हाला भेटण्याचं स्वप्नसुद्धा मी कधी पाहिलं नव्हतं. तुमच्यासोबत करायला मिळालेल्या सर्व गोष्टी एका बाजूला पण तुम्ही आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय आठवण आहात’, असं विजयने लिहिलं. ‘लायगर’ या चित्रपटात माईक टायसन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ते एका भारतीय चित्रपटात काम करत आहेत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर विजय देवरकोंडा आणि माईक टायसन यांची टक्कर पाहणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल.
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेतल्या चित्रपटांपैकी एक आहे. अभिनेत्री अनन्या पांडे यात विजयसोबत भूमिका साकारणार आहे. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विजयने ट्विटरवर माईक टायसनसोबतचे सेटवरील काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवरकोंडा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. ‘लायगर’ची सिनेमॅटोग्राफी विष्णू सरमा यांनी केली आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. करण जोहर आणि अपूर्व मेहता या चित्रपटाची एकत्र निर्मिती करत आहेत.
Happy Birthday @MikeTyson
I never even dreamt of meeting you, forget all the things I got to do with you. You are a memory for life ❤️#Liger pic.twitter.com/urFy4t2diJ— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) June 30, 2022
Making a cult film, with cult people 🙂
Some times we shared! @MikeTyson #PuriJagannadh @DharmaMovies @PuriConnects @Charmmeofficial @ananyapandayy#Liger pic.twitter.com/lYR64BgKj4— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) June 30, 2022
जगातील सर्वात महान बॉक्सर्समध्ये माईक टायसनचं नाव आवर्जून घेतलं जातं. 1985 ते 2005 पर्यंत ते बॉक्सिंग क्षेत्रात कार्यरत होते. 1992 साली माईकवर बलात्काराचे आरोप झाले होते. ते आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. बॉक्सिंग पाठोपाठ ते अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेत. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हँगओव्हर’ या हॉलिवूड चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. त्यानंतर 2011 मध्ये ‘हँगओव्हर 2’मध्येही ते झळकले.