Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikrant Rona Trailer: किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोना’चं ट्रेलर पाहून सलमान म्हणाला, ‘भाऊ तुझ्यावर..’

विक्रांत रोना'चा (Vikrant Rona) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून तो अपेक्षेपेक्षा भव्य दिव्य आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्या गेलेल्या किच्चा सुदीपच्या ग्रँड एंट्रीपासून त्याच्या अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत.

Vikrant Rona Trailer: किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोना'चं ट्रेलर पाहून सलमान म्हणाला, 'भाऊ तुझ्यावर..'
Kichcha SudeepImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:39 PM

अभिनेता किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेवरील वादामुळे चर्चेत होता. आता त्याच्या आगामी चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किच्चा सुदीपच्या 3डी मिस्ट्री थ्रिलर ‘विक्रांत रोना’चा (Vikrant Rona) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून तो अपेक्षेपेक्षा भव्य दिव्य आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्या गेलेल्या किच्चा सुदीपच्या ग्रँड एंट्रीपासून त्याच्या अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. लक्षवेधी संकल्पना आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या 3डी व्हिज्युअल्ससह हा ट्रेलर नेत्रदीपक पद्धतीने गावातील दृश्याची झलक पडद्यावर चित्रीत करतो. तसंच, किच्चा सुदीपची जहाजावरील एंट्री खरोखरच भव्य आणि थक्क करणारी असून ग्लॅमरस जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तिच्या हॉट अंदाजाने भुरळ पाडते. मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलरचं खास अनावरण करण्यात आलं असून तिथे उपस्थित पत्रकारांना ‘रा रा रक्कम्मा’ या खास गाण्याची झलक दाखवण्यात आली.

‘विक्रांत रोना’ हा चित्रपट चर्चेत येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे विविध इंडस्ट्रीतील मोठी नावं वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट लाँच करण्यासाठी एकत्र आली आहेत. सलमान खान हा चित्रपट हिंदीत लाँच करेल, धनुष तामिळमध्ये, दलकर सलमान मल्याळममध्ये, रामचरण तेलुगूमध्ये आणि किच्चा सुदीप कन्नडमध्ये लाँच करणार आहे. सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर करत लिहिलं, ‘भाऊ, तुझा विक्रांत रोना हा चित्रपट पाहून सर्वांना तुझा अभिमान वाटेल’.

पहा ट्रेलर

हे सुद्धा वाचा

अनुप भंडारी दिग्दर्शित ‘विक्रांत रोना’ हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी जगभरात 3डी मध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये किच्चा सुदीप मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, निरुप भंडारी आणि नीता अशोक यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट उत्तर भारतात सलमान खान फिल्म्स, झी स्टुडिओ आणि किच्चा क्रिएशन्सने सादर केला आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती जॅक मंजुनाथ यांनी त्यांच्या शालिनी आर्ट्सच्या निर्मिती अंतर्गत केली आहे. पीव्हीआर पिक्चर्सद्वारे हा चित्रपट उत्तर भारतात वितरित केला जाणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.