Video | सामन्यादरम्यान अनुष्काला ‘फ्लाईंग कीस’ तर मुलीच्या नावे अर्धशतक, विराटने जिंकली चाहत्यांची मनं, पहा व्हिडीओ…
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही जोडी सध्या त्यांच्या रोमान्समुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही जोडी सध्या त्यांच्या रोमान्समुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहलीने पत्नी अनुष्कासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर या दोघांचा आणखी एक रोमँटिक फोटोही समोर आला आहे. विराट कोहली सध्या आयपीएल 2021मध्ये व्यस्त असून, अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील तिच्या नवऱ्याला प्रोत्साहित करताना दिसत आहे (Virat Kohli dedicates his half century to daughter Vamika video goes viral on internet).
विराटने अर्धशतक केले मुलीला समर्पित
गुरुवारी (22 एप्रिल) संध्याकाळी विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार झुंज झाली. या सामन्यात कोहलीचा संघ विजयी झाला आणि कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची नाबाद खेळी साकारली. अशा परिस्थितीत आपले अर्धशतक पूर्ण करून विराट कोहलीने हे आपल्या मुलीला अर्थात ‘वामिका’ला (Vamika) समर्पित केले. तसेच, स्टँडवर बसलेल्या पत्नी अनुष्का शर्मा हिला त्याने फ्लाईंग किस देखील दिला. या क्षणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
कोहलीच्या शैलीने चाहते खुश!
या व्हिडीओमध्ये कोहली बॅट उंचावताना दिसून येत आहे. त्याचे सहकारी त्याच्यासाठी चीअर करत आहे आणि टाळ्या वाजवत आहे. यानंतर अनुष्काकडे पहात असताना कोहली हसतो आणि फ्लाईंग कीस देतो. त्यानंतर वामिकाला आपल्या कुशीत घेऊन खेळवत असल्याचा हावभाव करतो. विराट कोहलीच्या या स्टाईलने त्याचे चाहते खूप आनंद खुश झाले आहेत (Virat Kohli dedicates his half century to daughter Vamika video goes viral on internet).
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017मध्ये ‘इटली’ येथे लग्न केले होते. या दोघांची मुलगी ‘वामिका’चा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला होता. कोहली आणि अनुष्का सध्या मीडियाच्या नजरेतून आपल्या मुलीला लांब ठेवत आहेत.
मुलीच्या जन्मापूर्वी अनुष्का शर्मा एका मुलाखतीत म्हणाली, ‘आम्हाला आमच्या बाळाला सर्वत्र सार्वजनिक कॅमेरासमोर उभे करायचे आहे. आम्हाला तिला सोशल मीडियावर चर्चेत ठेवण्याची इच्छा नाही. मला वाटते की, आपल्या मुलीची स्वतःची इच्छा असावी. कोणत्याही मुलास असे शिकवले जाऊ नये की, ते इतरांपेक्षा खास आहे. आम्हा मोठ्या लोकांना याची खूप काळजी वाटते. हे अवघड असेल पण आम्ही ते करू इच्छितो.’
(Virat Kohli dedicates his half century to daughter Vamika video goes viral on internet)
हेही वाचा :
RCB vs RR 2021, Virat Kohli | कोहलीचा भीमप्रराक्रम, आयपीएलमध्ये ‘विराट’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज