Vamika | ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने विराट कोहलीची लेकीसाठी खास पोस्ट, वाचा काय म्हणाला विराट…

अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीने महिला दिनाच्या दिवशी पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचा फोटो शेअर करत विराटनेही खास कॅप्शन लिहिले आहे.

Vamika | ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने विराट कोहलीची लेकीसाठी खास पोस्ट, वाचा काय म्हणाला विराट...
वामिका
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 2:26 PM

मुंबई : आज अर्थात 8 मार्च रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व सेलेब्स खास पोस्ट्स शेअर करत आहेत. अशा वेळी विराट कोहलीने पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि लेक वामिकाचा एक खास फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीने या खास दिवशी पत्नी आणि मुलीला ‘महिला दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्या दोघींचा एक अतिशय खास फोटोही शेअर केला आहे (Virat Kohli share adorable photo of anushka and Vamika on womens day).

अनुष्का शर्माच्या चाहत्यांची यादी तशी खूपच लांब आहे. 11 जानेवारीला अनुष्काने चिमुकलीला जन्म दिला होता. गरोदरपणात ती सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करायची. 1 फेब्रुवारी रोजी मुलीच्या जन्मानंतर अनुष्काने सोशल मीडियावर मुलीचे पहिले छायाचित्र शेअर केले होते. याचबरोबर तिने लेकीचे नाव तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. आता अनुष्काच्या मुलीचा आणखी एक फोटो समोर आला आहे.

अनुष्काला मिळाल्या महिला दिनाच्या खास शुभेच्छा!

अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीने महिला दिनाच्या दिवशी पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचा फोटो शेअर करत विराटनेही खास कॅप्शन लिहिले आहे. विराटने लिहिले आहे की, ‘बाळाला जन्म देताना हे पाहणे सोपे नाही. हा प्रत्येकासाठी एक अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव असू शकतो. जेव्हा आपण हे पहाल तेव्हा आपल्याला महिलांचे खरे सामर्थ्य आणि देवत्व समजेल आणि देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले, हे आपणास समजले आहे. कारण, त्या आमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहेत.’

‘माझ्या आयुष्यातील सर्वात बळकट आणि कोमल मनाच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जी पुढे आपल्या आईसारखी होणार आहे, तिलाही खूप शुभेच्छा. आणि जगातील सर्व अद्भुत महिलांनाही महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.’ विराट कोहलीची ही खास पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, खासकरुन क्रिकेटरच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत (Virat Kohli share adorable photo of anushka and Vamika on womens day).

पहा विराटची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

(Virat Kohli share adorable photo of anushka and Vamika on womens day)

अनुष्काने शेअर केला लेकीचा फोटो

अलीकडेच अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मुलीला आपल्या हातात धरून प्रेमाने पाहत आहे. फोटोत अनुष्का आणि विराट हसत हसत मुलीकडे प्रेमाने बघत आहेत. फोटोसह अभिनेत्रीने मुलीचे नावही शेअर केले होते. विराट-अनुष्काने तिचे नाव ‘वामिका’ असे ठेवले आहे. वामिका हे आई दुर्गाचे समानार्थी आहेत.

मीडिया आणि सोशल मीडियापासून अंतर राखणार!

अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’

(Virat Kohli share adorable photo of anushka and Vamika on womens day)

हेही वाचा :

प्रल्हाद शिंदेची ‘अंतिम इच्छा’, ‘या’ कॅसेटसाठी पत्नीचे दागिने मोडले; आनंद शिंदेंचा मन हेलावणारा किस्सा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.