The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने 11 दिवसांत जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक आणि देशभरात 160 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय, तर दुसरीकडे याच चित्रपटावरून सोशल मीडियावर वादंग उठलंय.
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने 11 दिवसांत जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक आणि देशभरात 160 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय, तर दुसरीकडे याच चित्रपटावरून सोशल मीडियावर वादंग उठलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला. कमी बजेट आणि मोजकं प्रमोशन करूनसुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली, याचं काहीजण कौतुक करत आहेत. IAS अधिकारी नियाज खान (Niyaz Khan) यांनी ट्विट करत कमाईचे हे पैसे निर्मात्यांनी काश्मिरी पंडितांना दान करावं, असा सल्ला दिला. यावर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी उत्तर दिलं आहे. याआधीही एका पत्रकाराने चित्रपटाच्या कमाईवरून अग्निहोत्रींना सवाल केला होता. चित्रपटाने कमावलेले पैसे हे काश्मिरी पंडितांना देणार का, असं ट्विट संबंधित पत्रकाराने केलं होतं.
नियाज खान यांचं ट्विट-
मध्यप्रदेशचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी ट्विट केलं, ‘द काश्मीर फाईल्सची कमाई 150 कोटींपर्यंत झाली आहे. ही चांगली गोष्ट आहे. काश्मिरी ब्राह्मणांच्या भावनांचा लोकांनी आदर केला आहे. ब्राह्मण मुलांचं शिक्षण आणि काश्मीरमध्ये त्यांच्यासाठी घरं बांधण्यासाठी सर्व कमाई दिली, तर मीसुद्धा चित्रपट निर्मात्याचा आदर करेन. हे मोठं दान असेल.’
Income of Kashmir Files reached 150 crore. Great.People have given a lot of respect for Kashmiri Brahmins’ feelings.I would respect film producer to transfer all earnings to the Brahmin children’s education and construction of homes for them in Kashmir. It will be a great charity
— Niyaz Khan (@saifasa) March 20, 2022
विवेक अग्निहोत्रींचं उत्तर-
‘सर नियाज खान साहब, मी 25 तारखेला भोपाळला येतोय. कृपया भेटीसाठी तुमची वेळ द्या, जेणेकरून आपण भेटू आणि विचारांची देवाणघेवाण करू शकू. आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, तुम्ही तुमच्या पुस्तकांची रॉयल्टी आणि आयएएस अधिकारी म्हणून तुमच्या पॉवरद्वारे कशी मदत करू शकता याबद्दल आपण चर्चा करू,’ अशी प्रतिक्रिया अग्निहोत्रींनी दिली.
कोण आहेत नियाज खान?
नियाज खान हे मध्यप्रदेश पीडब्लूडीमध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काही पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. नियाज हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या धर्माची हिंसक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी नियाज हे संशोधनही करत आहेत. इस्लामला बदनाम करण्यामागे अनेक संघटनांची वाईट प्रतिमा असल्याचं त्यांचं मत आहे. नियाज यांनी आतापर्यंत सहाहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कादंबरीवर ‘आश्रम’ ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांना श्रेय न मिळाल्याने नियाज यांनी आश्रमचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. इस्लामची प्रतिमा जगात सुधारण्यासाठी नियाज हे कुराणवर संशोधन करत आहेत. मुहम्मद यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून त्यांना त्यांचं संशोधन पुस्तक युरोपमधून प्रकाशित करून घ्यायचं आहे. मी सर्व धर्मांना मानतो आणि मी शाकाहारी आहे, असा दावा ते करतात. नुकतंच त्यांनी इराकमधील याझिदींवर एक नवीन पुस्तक लिहिलं आहे. बी रेडी टू डाय असं या पुस्तकाचं नाव असून त्यात त्यांनी उत्तर इराकमधील यझिदी हे हिंदूंचेच स्वरूप असल्याचं सांगितलं आहे. तेही हिंदूंप्रमाणे सूर्य आणि अग्नीचे उपासक आहेत. नियाज खान याआधी हिजाब वादावरील ट्विटमुळे चर्चेत होते. ‘हिजाब आपल्याला प्रदूषणापासून सुरक्षित ठेवतो. हिजाबला प्रोत्साहन द्या जेणेकरून लोक कोरोना आणि वायू प्रदूषणापासून सुरक्षित राहू शकतील’, असं ते म्हणाले होते.
काल्पनिक कथेच्या आरोपांवर प्रत्युत्तर- 1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलं.
हेही वाचा:
‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?
Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!