The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे. प्रदर्शनानंतरचा पहिला आठवडा हा प्रत्येक चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. याच पहिल्या आठवड्यात 'द काश्मीर फाईल्स'ने प्रेक्षक-समीक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे.

The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर
Anupam KherImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 12:58 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास 80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतरचा पहिला आठवडा हा प्रत्येक चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. याच पहिल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ने प्रेक्षक-समीक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही. ‘द काश्मीर फाईल्स’च्या कथेने प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणला आहे. फक्त वीकेंडच नाही तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवसांतही चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले आहेत. सुरुवातीला फक्त 600 हून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद पाहून ‘द काश्मीर फाईल्स’चे शोज वाढवण्यात आले आहेत. (The Kashmir Files Box Office Collection)

सहाव्या दिवशी या चित्रपटाने 19.05 कोटी रुपये कमावले आहेत. सहा दिवसात ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचा आकडा हा 79.25 कोटी रुपये इतका झाला आहे. 100 कोटींपाहून अवघे काही पाऊल दूर हा चित्रपट आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ची कमाई-

शुक्रवार- 3.55 कोटी रुपये शनिवार- 8.50 कोटी रुपये रविवार- 15.10 कोटी रुपये सोमवार- 15.05 कोटी रुपये मंगळवार- 18 कोटी रुपये बुधवार- 19.05 कोटी रुपये एकूण- 79.25 कोटी रुपये

दुसऱ्या आठवड्यात विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट आणखी जास्त कमाई करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. होळीच्या सुट्ट्या आणि महिन्यातील दुसरा वीकेंड असल्याने अधिकाधिक प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये येतील, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत. पुढील एक-दोन दिवसांत ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचा आकडा हा 100 कोटींवर जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा:

कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.