Brahmastra मध्ये आलियाचा फक्त एकच डायलॉग? नेटकऱ्यांना पडला प्रश्न

ब्रह्मास्त्रच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. पहिल्या दिवशी जगभरात ब्रह्मास्त्रने 75 कोटींचा तर दुसऱ्या दिवशी 85 कोटींचा गल्ला जमवला.

Brahmastra मध्ये आलियाचा फक्त एकच डायलॉग? नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Ranbir and AliaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 6:51 PM

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चेत आला होता. एकीकडे सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात होती. तर दुसरीकडे चित्रपटातील कलाकारांना विरोध केला गेला. अशात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला बॉक्स ऑफिसवर मात्र तुफान प्रतिसाद मिळतोय. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल 160 कोटींची कमाई केली. फर्स्ट डे फर्स्ट शोपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील कथा, व्हीएफएक्स, कलाकारांचं अभिनय यावरून विविध मतं मांडली जात आहेत. आता काहींनी चित्रपटातील आलियाच्या डायलॉगवरून भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत.

चित्रपटातील विविध बाबींवर सोशल मीडियावर मतमतांतरे व्यक्त होत असतानाच आलियाचा डायलॉग विशेष चर्चेत आहे. ब्रह्मास्त्रमध्ये आलिया फक्त ‘शिवा’ हाच डायलॉग बोलताना दिसली, अशी तक्रार काही नेटकऱ्यांनी केली. या चित्रपटात आलियाने इशा तर रणबीरने शिवा ही भूमिका साकारली आहे.

हे सुद्धा वाचा

‘क्या हुआ शिवा, शिवा, शिवा क्या हुआ, ये क्या हो रहा है शिवा, आलिया फक्त इतकंच बोलताना दिसतेय’ असं एका युजरने लिहिलं. तर आलिया ब्रह्मास्त्रच्या सेटवर फक्त दिवसातून तीन-चार वेळा शिवा हाच डायलॉग बोलायला गेली वाटतं, असा टोलाही दुसऱ्या नेटकऱ्याने लगावला. संपूर्ण चित्रपटात आलिया किती वेळा शिवा बोलली हेच आम्ही मोजत बसलोय, असंही एकाने म्हटलंय.

ब्रह्मास्त्रच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. पहिल्या दिवशी जगभरात ब्रह्मास्त्रने 75 कोटींचा तर दुसऱ्या दिवशी 85 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात रणबीर-आलियासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.