The Kashmir Files मध्ये क्रूरतेची हद्द पार करणारा ‘बिट्टा’ कोण आहे? जो म्हणाला, “आईलाही मारू शकतो”

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट वादात सापडला असला तरी या चित्रपटाच्या समर्थनार्थ एक मोठा वर्ग उभा राहिला आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

The Kashmir Files मध्ये क्रूरतेची हद्द पार करणारा 'बिट्टा' कोण आहे? जो म्हणाला, आईलाही मारू शकतो
Bitta Karate, Chinmay Mandlekar (The Kashmir Files)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:31 PM

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट वादात सापडला असला तरी या चित्रपटाच्या समर्थनार्थ एक मोठा वर्ग उभा राहिला आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द काश्मीर फाइल्सचं कौतुक केलं. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची कथा या चित्रपटात दाखवली आहे. हा चित्रपट पाहून अनेकजण भावूक झाले, तर काहींच्या डोळ्यात अश्रूही आले. अनुपम खेर, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चिन्मयने चित्रपटात बिट्टा कराटे (Bitta Karate) ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. क्रूरतेची हद्द पार करणारा हा बिट्टा कोण आहे, ते जाणून घेऊयात..

बिट्टा कराटेची मुलाखत

बिट्टाची एक मुलाखत चित्रपटातही दाखवण्यात आली असून ही मुलाखत चर्चेचा विषय आहे. यासोबतच त्याच्या मूळ मुलाखतीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. बिट्टा कराटे असं मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर बिट्टा कराटेविषयीची माहिती शोधत आहेत आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतः बिट्टा कराटे याने 20 जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचं या मुलाखतीत दिसून येतं.

व्हायरल होत असलेल्या बिट्टा कराटेच्या मुलाखतीत, त्याने 20 लोकांची हत्या केल्याचं म्हटलंय. बिट्टा कराटेची ही मुलाखत पाहिल्यानंतर कोणालाही संताप येऊ शकतो. कारण त्याने केलेल्या क्रौर्याला तो शौर्य म्हणून सादर करतोय. जेव्हा बिट्टाला विचारण्यात आलं की, तुझ्या भावा-बहिणीला मारण्याचा आदेश आला असता, तर तू त्यांना मारलं असतं का? त्यावर बिट्टा अगदी धीटपणे ‘हो मारलं असतं’ असं म्हणतो. मुलाखतीत बिट्टाने असंही कबूल केलं की, “तो पाकिस्तानात 32 दिवसांची ट्रेनिंग घेऊन आला होता. तो अवघ्या 20 वर्षांचा असताना प्रशासनावर नाराज होऊन दहशतीचा मार्ग पत्करला होता.”

कोण आहे बिट्टा कराटे?

बट्टा कराटेचं खरं नाव फारुख अहमद डार आहे. एका माहितीनुसार, फारुख अहमद डार हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष आहे. बिट्टाला 1990 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि 16 वर्षे म्हणजे 2006 पर्यंत तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर बिट्टा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये सामील झाला. त्यानंतर 2019 मध्येही बिट्टाला एनआयएने अटक केली होती.

हेही वाचा:

‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव

‘Jhund’ आणि ‘The Kashmir Files’ने समाजात दोन गट पाडले? नागराज मंजुळे म्हणतात..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.