Special story: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारा छोटू पांडे आहे तरी कोण?

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर छोटू पांडेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये छोटू पांडे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास नाते दिसून येते. | Bollywood

Special story: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारा छोटू पांडे आहे तरी कोण?
या सगळ्याला छोटू पांडे हा पापाराझ्झी अपवाद ठरताना दिसतो. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर छोटू पांडेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 8:02 AM

मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या नट आणि नट्यांपासून ते छोट्या तैमूरपर्यंत सर्वजण खासगी आयुष्यात छायाचित्रकारांपासून (paparazzi) चार हात लांब राहताना दिसतात. हे सेलिब्रिटी कुठेही फिरायला किंवा कोणत्या मित्र-मैत्रिणीला भेटायला जातात, यावर या फोटोग्राफर्सची करडी नजर असते. त्यामुळे एकप्रकारे बॉलीवूड कलाकारांच्या खासगी स्पेसवर हे छायाचित्रकार अतिक्रमण करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा सेलिब्रिटी या छायाचित्रकारांवर किंवा पापाराझ्झी वैतागतात, त्यांच्यावर रागवतात. मात्र, हे पापाराझ्झी काही केल्या सेलिब्रिटींचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळे पापाराझ्झी दिसले की सेलिब्रिटी लगेच तेथून काढता पाय घेताना दिसतात. (Why there is buzz about Chotu Pandey in bollywood)

मात्र, या सगळ्याला छोटू पांडे हा पापाराझ्झी अपवाद ठरताना दिसतो. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर छोटू पांडेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये छोटू पांडे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास नाते दिसून येते. एरवी कोणाशीही कामाशिवाय चकार शब्द न बोलणारे बॉलिवूड सेलिब्रिटी छोटू पांडेसोबत मजा मस्करी करताना दिसतात. वरुण धवन, अपारशक्ती खुराना आणि सिद्धार्थ शुक्ला या बॉलीवूड सेलिब्रिटींचे छोटू पांडेसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओंमध्ये छोटू पांडे हा बॉलीवूडच्या सेलिब्रिटींशी अगदी सहज गप्पा मारताना दिसतो. त्यांच्यासोबत सेल्फी काढताना अजिबात कचरत नाही. एकूणच छोटू पांडे या बॉलीवूड सेलिब्रिटींसमोर दबून न जाता बिनधास्त वावरतो. त्यामुळेच कदाचित छोटू पांडे बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असावा. त्याची बॉलीवूड सेलिब्रिटींशी असणारी ही गट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

View this post on Instagram

A post shared by سنيها (@varunica_heart)

वरुण धवन छोटू पांडेल काय म्हणाला होता?

छोटू पांडे हा बॉलीवूड सेलिब्रिटींचे फोटो टिपण्यासाठी जीवाचे रान करत असतो. विशेषत: वरुण धवन त्याचा आवडता कलाकार आहे. अनेकदा छोटू पांडे वरुण धवनचे फोटो घेताना रस्त्यावर स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत नाही. एकदा होळीच्या दिवशी छोटू पांडे वरुण धवनच्या मागावर होता. वरुण धवन जीममधून बाहेर पडल्यानंतर रेकॉर्डिंक स्टुडिओपर्यंत छोटू त्याच्या पाठीपाठी होता.

यावेळी रस्त्यावर मिळेल त्या अँगलने छोटू वरुण धवनचे फोटो टिपत होता. त्यावेळी वरुण धवनने जवळच उभ्या असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला बोलावले होते. तुम्ही छोटू पांडेला स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यायला सांगा नाही तर त्याला जेलमध्ये टाका, असे वरुणने मजेत पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने खरंच छोटू पांडेचा कॅमेरा हिसकावून घेतल्यामुळे तो थोडा वेळ घाबरलाही होता.

नेपाळमधून आला आहे छोटू पांडे

छोटू पांडे हा मूळचा नेपाळचा आहे. त्याने मध्यंतरी होळीच्या वेळी वरुण धवनसोबत एक व्हिडीओ शुट केला होता. त्यामध्ये छोटूने वरुणला माझ्या गावातील नेपाळच्या लोकांना होळीच्या शुभेच्छा दे, अशी विनंती वरुणला केली. तेव्हा वरुणने नेपाळ हे गाव नाही तर देश असल्याचे छोटू पांडेला सांगितले. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

(Why there is buzz about Chotu Pandey in bollywood)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.