“तेव्हा पहिली पत्नी अनवाणी सिद्धीविनायकला चालत गेली”; बोनी कपूर यांचा खुलासा

बोनी कपूर हे बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी बॉलिवूडमधल्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली. मात्र त्यापैकी काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रुप की रानी चोरों का राजा' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

तेव्हा पहिली पत्नी अनवाणी सिद्धीविनायकला चालत गेली; बोनी कपूर यांचा खुलासा
Mona Kapoor and Boney KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 8:34 PM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये काही हिट चित्रपटांची निर्मिती केली. मात्र त्याचसोबत त्यांचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. त्यापैकीच एक म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेला ‘रुप की रानी चोरों का राजा’ हा चित्रपट. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर त्यांच्या करिअरमधील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. ‘रुप की रानी चोरों का राजा’ हा चित्रपट जेव्हा फ्लॉप झाला, तेव्हा त्यांचे स्वत:चे आणि इतर गुंतवणूकदारांचेही पैसे बुडाले होते.

गुंतवणूकदारांचेही पैसे गमावले

याविषयी बोनी कपूर म्हणाले, “जेव्हा इतका मोठा चित्रपट फ्लॉप होतो, तेव्हा तुम्ही स्वत:चे पैसे तर गमावताच. पण त्याचसोबतच जे पैसे तुम्ही इतरांकडून कर्ज म्हणून घेतलेले असता, तेसुद्धा तुम्ही गमावून बसता. मात्र अशा परिस्थितीनंतर मी आणखी शक्तीशाली होऊनच पुढे आलो. त्यावेळी माझी पहिली पत्नी मोना कपूर घरापासून सिद्धीविनायक मंदिरापर्यंत अनवाणी चालत गेली होती. माझी भावंडं माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते.”

“कधीच नंबर बदलला नाही”

‘रुप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका होत्या. सतिश कौशिक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांना मोठा फटका बसला होता. “मात्र कितीही आर्थिक नुकसान झालं तरी कर्ज घेणाऱ्यांकडून पळ काढण्यासाठी मी कधीच माझा फोन नंबर बदलला नाही. किंबहुना 1994 पासून माझे तेच दोन फोन नंबर आजही कायम आहेत. ज्या लोकांना मी पैसे द्यायचे आहेत, त्यांचेही फोन मी उचलतो आणि ज्या लोकांना मी ओळखत नाही, अशा लोकांचेही फोन उचलतो,” असं बोनी कपूर यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

बोनी कपूर सध्या अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च सोडता इतर सर्व कर्ज फेडल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी काही संपत्तीसुद्धा विकली. त्यातून मिळालेल्या पैशांनी त्यांनी इतर सर्वांचे कर्ज फेडले.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....