Kapil Sharma | कपिल शर्मावर का भडकला WWE रेसलर? खोटेपणा दाखवल्याचा केला आरोप

सौरवच्या या आरोपावर कपिल शर्माने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सौरव हा WWE स्टार असून त्याने ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूरसोबत काम केलं आहे.

Kapil Sharma | कपिल शर्मावर का भडकला WWE रेसलर? खोटेपणा दाखवल्याचा केला आरोप
Saurav Gurjar and Kapil SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:40 AM

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. मात्र कपिल आणि त्याच्या शोच्या टीमने नुकतंच असं काही केलंय, ज्यामुळे WWE सुपरस्टार आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये भूमिका साकारलेला सौरव गुर्जर त्याच्यावर भडकला आहे. कपिलने त्याच्या शोमध्ये सौरवच्या फोटोवरील कमेंट्स खोटे दाखवल्याचा आरोप सौरवने केला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘पोस्ट का पोस्टमॉर्टम’ या एका भागात इन्स्टाग्राम फोटोवरील कमेंट्स वाचून त्यावरून मस्करी केली जाते. मात्र यावेळी कपिलने सौरवच्या फोटोवरील खोटे कमेंट्स दाखवले, असा आरोप करण्यात आला आहे.

द कपिल शर्मा शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि अनुभव सिंह बस्सी यांनी हजेरी लावली होती. ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी ते या शोमध्ये पोहोचले होते. ‘पोस्ट का पोस्टमॉर्टम’ या सेगमेंटमध्ये कपिलला सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील कमेंट्स वाचून दाखवायचे होते. रणबीर कपूरचं सोशल मीडियावर अकाऊंट नसल्याने कपिलने दुसऱ्या एका अकाऊंटवरील रणबीरसोबतचा फोटो सर्वांना दाखवला.

हे सुद्धा वाचा

सौरवने पोस्ट केलेला फोटो

View this post on Instagram

A post shared by Saurav_Gurjar (@sanga_wwe)

यापैकीच एक फोटो सौरव गुर्जरसोबतचा होता. रणबीरसोबत जिममधला हा फोटो सौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तो रणबीरला त्याच्या पाठीवर उचलून घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यावरील कमेंट्स कपिलने दाखवले. ‘काही लोकांना असंच जिममध्ये आणावं लागतं’, अशी एक कमेंट कपिलने वाचून दाखवली. तर दुसऱ्या कमेंट्मध्ये लिहिलं होतं, ‘त्यांना 70 किलोंचा डंबल हवा होता, नाही मिळाला म्हणून रणबीरला उचलून घेऊन आले.’ या फोटोवरील आणखी कमेंट अशी होती की, ‘रणबीरने नवीन कार घेतली वाटतं, बी एम बबलू.’

ट्विटरवर व्यक्त केली नाराजी

सौरवने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर कपिल शर्मा शोमधील या सेगमेंटचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर नाराजी व्यक्त करत त्याने लिहिलं, ‘तुम्ही चांगले आहात. कपिल शर्मा लोकांना हसवतात मात्र तुम्ही आणि तुमची टीम हे खोटे कमेंट्स कसे दाखवू शकतात? हे योग्य नाही.’ सौरवच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनाही ही बाब खटकली. रणबीरसोबतच्या फोटोवर असे कोणतेच कमेंट्स दिसत नसल्याचं युजर्सनी दाखवलं.

सौरवच्या या आरोपावर कपिल शर्माने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सौरव हा WWE स्टार असून त्याने ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूरसोबत काम केलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.