Sushant Singh Rajput Case | आधी 30 जणांचे खुले जबाब, आता मात्र पोलिसांकडून छुपी चौकशी
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आता संबंधितांचे लपूनछपून जबाब घेत आहेत.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (Sushant Singh Rajput Suicide) मुंबई पोलीस आता संबंधितांचे छुप्या पद्धतीने जबाब घेत आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवसापासूनच त्याच्या आत्महत्येचा तपास सुरु झाला आहे (Brandra Police Investigating Sushant Singh Rajput Suicide Case).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
30 जणांचे खुले जबाब
हा तपास वांद्रे पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे 30 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत पोलीस ज्याचा जबाब घ्यायचा आहे, त्या व्यक्तीला वांद्रे पोलीस स्टेशन येथे बोलवायचे आणि त्यानंतर त्याचा जबाब घ्यायचे. अशा पद्धतीने 30 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत.
आता मात्र, पोलीस छुप्या पद्धतीने जबाब घेत आहेत. नुकताच सुषमा शेट्टी यांचा जबाब घेण्यात आला आहे. सुषमा शेट्टी या सलमान खान यांच्याशी संबंधित आहेत. त्यांचा जबाब छुप्या पद्धतीने घेण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांच्या या पद्धतीने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या
सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.
Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेलhttps://t.co/sN7l8aGxhG#ShekharKapoor #SushantSingRajput
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 9, 2020
Brandra Police Investigating Sushant Singh Rajput Suicide Case
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं?
Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब