दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध पॉप बँड (K Pop Band) बीटीएस (BTS) जगभरात लोकप्रिय आहे. सात तरुणांच्या या ग्रुपवर केवळ दक्षिण कोरियातच नाही तर भारतासोबतच इतरही देशांमधील चाहत्यांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होतो. गेल्या काही वर्षांत कोरियाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यात बीटीएसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या घडीला जगभरात BTS चे कोट्यवधी चाहते आहेत. बीटीएसमधील कुठल्याही मेंबरवर सोशल मीडियावर टीका झाली तर हे कोट्यवधी चाहते त्या सदस्याच्या बचावासाठी धावून येतात. बीटीएसवर टीका करणाऱ्या एका भारतीय शिक्षकाचा (Indian Teacher) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या शिक्षकावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गणिताचे शिक्षक सिद्धार्थ मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक विद्यार्थिनी ऑनलाइन क्लासदरम्यान बीटीएस बँडचं नाव घेत होती. अखेर भडकलेल्या शिक्षकाने संबंधित मुलीला खूप फटकारलं. एवढेच नाही तर त्याने बीटीएस बँडवरही टीका केली. त्याचाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर या शिक्षकावर बरीच टीका झाली. विद्यार्थिनीने क्लासमध्ये बीटीएसचा उल्लेख करताच शिक्षण म्हणाला, “बीटीएस चाहत्यांनो ऐका, तुमच्या घरी जेवण नसेल तर बीटीएस तुमच्यासाठी जेवण बनवायला येणार नाही. तुम्ही त्यांची गाणी ऐकून इतके खूश होता. तुम्ही जर बीटीएसचे चाहते असाल तर तुमच्या शिक्षणाचा काहीच फायदा नाही. तू मुलगी नसती तर मी तुझं कॉलर पकडून कानशिलात लगावली असती. तुझे गाल इतके सुजले असते की तू बीटीएस हा शब्द तोंडून उच्चारू शकली नसती.”
@PhysicswallahAP what was that” lipstick laga ka gaana gata ha ” he is sense or not we #ARMY fandom of BTS don’t tollrate this trash is he is here to teach your students or give her trash knowledge to students is he don’t know the re of India all people are equal pic.twitter.com/j0Jf2QAMPW
— ⁷My Precious_Jungkook? ? BTS PR⟬⟭⟬⟭F ? ?? (@Jeonjk124) August 15, 2022
सोशल मीडियावरील टीका वाढत असल्याचं पाहून अखेर शिक्षकाला माफीही मागावी लागली. शिक्षक सिद्धार्थ मिश्रा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. “माझ्या वर्गातील एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ती मुलगी बीटीएसबद्दल बोलत होती, म्हणून मी तिच्यावर रागावलो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनीही तो पाहिला. मुलीवर अशाप्रकारे भडकू नका, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं,” हे सांगत असतानाच शिक्षकाने माफीही मागितली. मी माझे शब्द मागे घेतो, असं त्या शिक्षकाने म्हटलंय.
Here is his apology video @ Instagram- siddy4544 #BTS #BTSARMY #INDIANBTSARMY #PHYSICSWALLAH #MSMSIR pic.twitter.com/QAO1NlOu6k
— Vote for BTS on VMA and V on Idolchamp (@btsiseverytking) August 15, 2022
12 जून 2013 रोजी ‘बीटीएस’ या कोरियन पॉप बँडच्या नावांतर्गत सात तरुणांच्या एका ग्रुपने पॉपविश्वात पदार्पण केलं. ‘बटर’, ‘डायनामाइट’, ‘परमिशन टू डान्स’ ही गाणी कधी तुमच्या कानावर पडली असतील, तर तुम्हाला बीटीएस म्हणजे काय याची थोडीफार कल्पना असेल. आरएम, शुगा, जिमीन, जंगकुक, व्ही, जे होप आणि जीन अशा सात तरुणांचा हा बँड आहे. गेल्या नऊ वर्षांत या बँडने एकापेक्षा एक दमदार म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. नुकतीच या सात जणांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी या पुरस्कारासाठी या बँडला दोन वेळा नामांकन मिळालं आहे. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केली असून पॉपविश्वात अनेक विक्रमसुद्धा रचले आहेत.