Amitabh Bachchan यांच्या अडचणीत मोठी वाढ; CAIT कडून तक्रार दाखल

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. बिग बी यांच्याविरोधात CAIT कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या... सध्या सर्वत्र फक्त आणी फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा...

Amitabh Bachchan यांच्या अडचणीत मोठी वाढ; CAIT कडून तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 8:19 AM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे केले आहेत. आजही त्यांच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. बिग बी यांनी फक्त सिनेमेच नाही तर, अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे. ज्यामुळे अनेकदा अमिताभ बच्चन यांना टीकेचा देखील सामना करावा लागला आहे. याच संबंधी एक नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) अमिताभ बच्चन आणि फ्लिपकार्टवर टीका केली आहे. एवढंच नाही तर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे (सीसीपीए)  तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात अनुचित व्यापार पद्धती आणि खोट्या तथ्यांनी भरलेली आहे.. असं तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. याप्रकरणामुळे अमिताभ बच्चन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी CCPA कडून दाखल कण्यात आलेल्या तक्रारीवर वक्तव्य केलं आहे. ‘फ्लिपकार्टने अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून माबाईल किंमतींच्या बाबतीत ग्राहकांची दिशाभूल केली आहे. फ्लिकार्ड ज्या किंमतीत मोबाईलची विक्री करत आहेत, तेवढ्या किंमतीत व्यापारी करू शकत नाहीत. म्हणून हा व्यापाऱ्यांचा अपमान आहे असं देखील सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, हे सरकारी नियमांच्या विरोधात देखील आहे.’

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी २०२२ मध्ये जारी केलेल्या नियम ४ नुसार, फ्लिपकार्टची ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. कारण त्यात खरे आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व नाही आणि ती पूर्णपणे खोटी आहे. सध्या सर्वत्र फ्लिपकार्ट आणि अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

फ्लिपकार्टच्या जाहिरातीला होणारा विरोध पाहता जाहिरात हटवण्याची मागणी भरतिया आणि खंडेलवाल यांच्याकडून करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, भरतिया आणि खंडेलवाल यांनी खोट्या किंवा दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसाठी CPA च्या कलम ८९ नुसार फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करणारी असल्यामुळे, दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात यावा, तर महानायक अमिताभ बच्चन यांना देखील १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा असं मागणी देखील भरतिया आणि खंडेलवाल यांच्याकडून करण्यात आली आहे. शिवाय खंडेलवाल यांनी बिग बी यांच्यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.