Sidharth – Kiara लग्नानंतर दोन वर्षांत होणार आई – बाबा ! कसं असेल कपलचं वैवाहिक आयुष्य
Sidharth - Kiara यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठी माहिती समोर; लग्नानंतर दोन वर्षांत मल्होत्रा कुटुंबात येणार नवीन पाहुणा? ....लग्नानंतर कसं असेल सिद्धार्थ - किआरा यांचं आयुष्य ?

Sidharth Kiara Wedding Reception: अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. किआरा – सिद्धार्थ ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. आता दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत असताना सेलिब्रिटी कार्ड रिडरने दोघांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार दिव्या पंडित यांनी किआरा – सिद्धार्थ यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
दिव्या पंडित यांच्या भविष्यवाणीनुसार, ‘किआरा – सिद्धार्थ जे काही करतात ते बेस्ट असतं. किआरा एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. तिच्यामध्ये एक आई आणि पत्नी सारखी भावना आहे. दोघे देखील सामान्य व्यक्ती आहेत. दोघांचं वैवाहिक आयुष्य उत्तम असेल. किआर एक उत्तम पत्नी असेल. दोन वर्षांत कपलला दोन मुलं होतील.’
दिव्य पंडित पुढे म्हणाल्या, ‘सिद्धार्थसाठी किआरा अत्यंत लकी असणार आहे. लग्नानंतर दोघांचं एक प्रॉडक्शन हाऊस असेल. लग्नानंतर किआराच्या आयुष्यात उत्तम ट्रांसफॉर्मेशन होणार आहे. सिद्धार्थच्या कुटुंबाकडून अभिनेत्री पाठिंबा मिळणार आहे.’ असं देखील दिव्या पंडित म्हणाल्या. (sidharth malhotra wedding)
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या.
किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. पण यावर दोघांनी कधीही अधिकृत घोषणा केली नाही. दोघांनी त्यांचं रिलेशन आणि लग्नबद्दल अनेक गोष्टी गुपित ठेवल्या. आता चाहत्यांनी किआरा – सिद्धार्थ यांना पती-पत्नी म्हणून एकत्र पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे लग्नानंतर कपल फोटो कधी पोस्ट करणार या प्रतीक्षेत चाहते आहेत.
किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाहुण्यांना देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंधनकारक असणार आहे. किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नासाठी मित्र परिवार आणि कुटुंबिय विवाहस्थळी पोहोचले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा यांचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यानंतर सिद्धार्थ – किआरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.