SSR Case | आर्थिक व्यवहार, वॉटर स्टोन रिसॉर्ट आणि, ड्रग्स! सीबीआय चौकशीत काय काय झालं?
रियाच्या चौकशीचा आजचा चौथा दिवस आहे. रिया प्रमाणेच आज या प्रकरणातील इतर संशयित शौविक चक्रवर्ती, श्रुती मोदी आणि सॅम्युल मिरांडा यांची चौकशी सुरु आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात आज पुन्हा रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे (CBI Inquiry Rhea Chakraborty). रियाच्या चौकशीचा आजचा चौथा दिवस आहे. रियासोबत इतर चार संशयितांचीही चौकशी सुरु आहे. सुशांत सिंग प्रकरणात सीबीआयने आज पुन्हा रिया चक्रवर्ती आणि इतर संशयितांना चौकशीसाठी बोलावलं आहे. सीबीआयच्या चौकशीचा 12 वा दिवस आहे. तर रियाच्या चौकशीचा आजचा चौथा दिवस आहे. रिया प्रमाणेच आज या प्रकरणातील इतर संशयित शौविक चक्रवर्ती, श्रुती मोदी आणि सॅम्युल मिरांडा यांची चौकशी सुरु आहे (CBI Inquiry Rhea Chakraborty).
सीबीआय सुरुवातीला या प्रकरणातील साक्षीदार यांच्याकडे चौकशी करत होती. मात्र, आता थेट संशयितांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी दोन संशयित आहेत. ते म्हणजे रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि आई. त्यांना अजून सीबीआयने चौकशीसाठी बोलावलं नाही.
सीबीआयने आता या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, श्रुती मोदी आणि सॅम्युल मिरांडा यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. या सर्वांवर वेगवेगळे आरोप आहेत.
सुशांतच्या खात्यातील पैसे सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यामार्फत काढले आहेत. तर रियाच्या सांगण्यावर सॅम्युल मिरांडा हा काम करत होता. रियाच्या इशाऱ्यावर तो काम करत होता. याबाबत रिया आणि सॅम्युअल यांची समोरासमोर चौकशी केली जात आहे. यावेळी शौविक याचीही चौकशी केली जात आहे. शौविक हा सुशांतच्या कंपनीत डायरेक्टर होता. या अनुषंगाने त्याच्याकडे आर्थिक मुद्यावर चौकशी केली जात आहे (CBI Inquiry Rhea Chakraborty).
आणखी एक महत्वाची संशयित म्हणजे श्रुती मोदी. श्रुती ही सुशांतची मॅनेजर होती. सुशांतचे आर्थिक व्यवहार ती पहायची. तिच्याकडे ही सुशांतच्या मिळकती बाबत चौकशी सुरु आहे. श्रुती आणि रिया यांचीही एकत्र चौकशी सुरु आहे.
आज जया साहला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, एक दोन तासात तिला परत पाठवण्यात आलं. जयाकडे ड्रग्सच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.
जयाला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची श्यक्यता आहे. आता काही वेळापूर्वी सुशांतला ज्या वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये दोन महिने ठेवण्यात आलं होतं. त्या रिसॉर्टच्या काही कर्मच्याऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
आज तीन मुद्यांवर चौकशी सुरु आहे.
1) आर्थिक व्यवहार
2) वॉटर स्टोन रिसॉर्ट मध्ये काय झालं
3) ड्रग्सच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे
सुशांत आणि रियाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल, पैशांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा, बॉलिवूड सोडण्याबाबतही भाष्यhttps://t.co/OV2wzlWiG3 #SushantSinghRajputDeathCase #RheaChakroborty
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2020
CBI Inquiry Rhea Chakraborty
संबंधित बातम्या :
प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा
Sushant Singh Death Case | “रियाला 2017 मध्ये भेटलो” हॉटेलियर गौरव आर्याला ईडीचे समन्स