लग्नाबद्दल विचारताच ‘ती’ लाजली; दोन वेळा घटस्फोट झालेल्या अभिनेत्यावर क्रश, अभिनेत्रीकडून सलमानसमोर भावना व्यक्त
बिग बॉसच्या घरात प्रेम फुलताना दिसत आहे. घटस्फोट झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या अभिनेत्रीने सलमान खानसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.

सलमान खानच्या सुरक्षेची सध्या जास्तच काळजी घेतली जात आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली गेल्यामुळे त्याच्या आजूबाजूला सुरक्षेचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सलमानला वाय प्लस सेक्युरिटी देण्यात आली आहे. ‘बिग बॉस १८’ च्या शुटींगवेळीही त्याच्या सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेतली आहे. सध्या ‘बिग बॉस’१८ व्या पर्वाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. नुकताच विकेंड का वार पार पडला. . त्यामुळेच सलमान विकेंड वार करणार नसल्याची चर्चा होती. सलमान खानने मात्र कमिटमेंट पाळली आणि त्याने विकेंड का वारचे शुटींग पूर्ण केले. त्यामुळे हा विकेंड का वार पाहण्यासाठी तसेच सगळेच प्रेक्षक उत्सुक होते.
सलमानसमोर अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली
सलमान खानचे विकेंड का वारचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. दरम्यान विकेंड का वारमध्ये सलमान आठवड्याभरात झालेल्या घडामोडींवर बोलतो, तसेच घरातील सदस्यांची शाळाही घेतो. त्याचप्रमाणे या विकेंड का वारला आठवड्याभरात रेशनवरून झालेल्या वादावर सलमान बोलला. त्याने अरफीन खान आणि त्याची पत्नी सारा खानची चांगलीच कान उघडणी केली. याच दरम्यान हिंदी टेलिव्हिजनवरील संस्कारी सून म्हणून ओळखली जाणारी चाहत पांडेने सलमान खानसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
बिग बॉसच्या घरात सदस्य असणारा अभिनेता करण वीर मेहरावर चाहतचा जीव जडल्याचं दिसून येत आहे. यावरून घरातील सदस्यही त्या दोघांना चिडवताना दिसतात. सलमान याबाबत बोलत असताना श्रुतिका अर्जुन म्हणते, “मला वाटतं, चाहतला करणवीर मेहरावर क्रश आहे”, हे ऐकून चाहत लाजते आणि सलमान खानही हसायला लागतो. नंतर करण वीर मेहरा देखील स्वतःच्या भावना व्यक्त करतो. “चाहत, तू मला खरंच खूप आवडते”, असं म्हणत तोही तिला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करतो.
View this post on Instagram
करणचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे.
त्यामुळे पुढील भागांत चाहत आणि करणचं हे नातं फुलताना प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल यात शंका नाही. पण हा प्रोमो पाहून नेटकरी म्हणत आहेत की, ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता आता तिसऱ्यांदा लग्न करणार वाटतं. करण हा ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता असून दोन वेळा त्याचा घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे दोन वेळा घटस्फोट झालेल्या अभिनेत्यावर चाहतचा जीव जडला आहे यावरून सर्वत्रच चर्चा रंगली आहे. दरम्यान या प्रोमोनंतर चाहत्यांनी सुद्धा या दोघांच्या जोडीला पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील एकूण १० जण नॉमिनेट झाले होते. तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा या सदस्यांपैकी हेमा शर्मा घराबाहेर आली आहे.