AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CHYD | ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘प्रजासत्ताक दिन’ विशेष भागात दिग्गजांबरोबर रंगणार गप्पांची मैफल!

‘हवा येऊ द्या’मध्ये हा आठवडा ‘प्रजासत्ताक दिन’ विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

CHYD | ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘प्रजासत्ताक दिन’ विशेष भागात दिग्गजांबरोबर रंगणार गप्पांची मैफल!
‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असं म्हणत गेली 6 वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र, तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
| Updated on: Jan 25, 2021 | 3:31 PM
Share

मुंबई : ‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असं म्हणत गेली 6 वर्षे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र, तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. निलेश साबळे आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंज करत आहे. दर आठवड्याला काहीतरी नवीन संकल्पना घेऊन हे विनोदवीर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असतात (Chala Hawa Yeu Dya Republic day special latest episode).

‘प्रजासत्ताक दिन’ विशेष आठवडा

याच लोकप्रिय ‘हवा येऊ द्या’मध्ये हा आठवडा ‘प्रजासत्ताक दिन’ विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ.तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी अशी दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. विविध क्षेत्रातील हे दिग्गज या विशेष भागात आपले अनुभव व्यक्त करताना दिसणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’चा हा ‘प्रजासत्ताक दिन’ विशेष आठवडा 25 ते 27 जानेवारीला प्रक्षेपित होणार आहे.

दिग्गजांच्या पत्नी आणि कुटुंबासोबत रंगणार गप्पांची मैफल

या विशेष भागात IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ.तात्याराव लहाने यांनी सहकुटुंब उपस्थिती दर्शवली होती. या विशेष भागाच्या निमित्ताने दिग्गजांचे अनेक किस्से त्यांच्या कुटुंबाकडून ऐकायला मिळणार आहेत. तर, यावेळी ‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत चक्क न्यायालय अवतरणार आहे. या न्यायालयात जेष्ठ वकील उज्वल निकम यांना प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत. एकूणच हा आठवडा देखील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे (Chala Hawa Yeu Dya Republic day special latest episode).

(Chala Hawa Yeu Dya Republic day special latest episode)

कथाबाह्य कार्यक्रमात ‘हवा येऊ दे’चा गाजावाजा…

‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत. ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनाही डॉ. निलेश साबळेंनी (Dr Nilesh Sable) वसवलेल्या थुकरटवाडीत हजेरी लावल्याशिवाय चैन पडत नाहीत.

या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळेसह भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे आणि श्रेया बुगडे हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत झळकतात. 2020 च्या दिवाळीपासून स्वप्निल जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट यातील कलाकार हजेरी लावतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करतात, त्या संबंधित माहिती प्रेक्षकांना देतात. केवळ मराठी कलाकाराच नव्हे तर, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर राजकिय नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. बऱ्याच वेळा चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हिंदी चित्रपटातील कलाकारांना देखील बोलावले जाते. अत्यंत कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

(Chala Hawa Yeu Dya Republic day special latest episode)

हेही वाचा :

Special Story | मनोरंजन विश्वात ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.