AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमीन’च्या जागी ‘जय भवानी’..; ‘छावा’मधील या डायलॉग्समध्ये बदल, तर काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री

'छावा' या चित्रपटातून लेझीम नृत्याचा सीन काढून टाकणार असल्याचं दिग्दर्शकांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील आणखी काही सीन्स आणि डायलॉग्सवरही सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. हे डायलॉग्स आणि सीन्स कोणते, ते जाणून घेऊयात..

'आमीन'च्या जागी 'जय भवानी'..; 'छावा'मधील या डायलॉग्समध्ये बदल, तर काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री
विकी कौशलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 11, 2025 | 2:50 PM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या दृश्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ते दृश्य हटवण्याचा निर्णय टीमकडून घेण्यात आला. लेझीम नृत्यकला जगभरात पोहोचावी, केवळ या उद्देशाने ते दृश्य चित्रपटात समाविष्ट केल्याचं दिग्दर्शक, अभिनेत्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपटातील इतरही काही दृश्ये आणि संवादांवर कात्री चालवण्यात येणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही दृश्यांमध्ये आणि संवादांमध्ये बदल सुचवले आहेत.

मराठा योद्धांनी साडी नेसल्याचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. त्याचप्रमाणे ज्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे, त्याचं नाव सांगणारा डिस्क्लेमर समाविष्ट करण्यास सांगितलं आहे. याव्यतिरिक्त डिस्क्लेमरमध्ये हेसुद्धा स्पष्ट करण्याची सूचना दिली आहे की, या चित्रपटाचा हेतू कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याचा किंवा तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा नाही.

‘छावा’ या चित्रपटातील ‘हरा*****’ शब्दाला म्यूट करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही डायलॉग्समध्येही बदल सुचविण्यात आले आहेत. ‘मुघल सल्तनत का जहर’ या डायलॉगला बदलून ‘उस समय, कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थें’ असं करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘खून तो आखिर मुघलों का ही है’ हा संवाद बदलून ‘खून तो है औरंग का ही’ असं केलंय. चित्रपटातील एका सीनमध्ये ‘आमीन’ या शब्दाऐवजी ‘जय भवानी’ हा शब्द वापरण्यास सांगितलं आहे. प्रेक्षकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन हे बदल सुचविण्यात आले आहेत.

  • ’16 वर्षे’ बदलून ’14 वर्षे’ असं केलंय
  • ’22 साल का लडका’ बदलून ’24 साल का लडका’ असं केलंय
  • ‘9 साल’ बदलून ‘कई साल’ असं केलंय

‘छावा’ला सेन्सॉर बोर्डाने ‘युए 16+’ची रेटिंग दिली आहे. या चित्रपटाचा रनटाइम 161 मिनिटं आणि 50 सेकंद म्हणजेच जवळपास 2 तास 42 मिनिटं इतका आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनाही दाखवणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं होतं.

बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.