‘छावा’ सिनेमा गाजवणारा विकी कौशल किती कोटींचा मालक? जगतो रॉयल आयुष्य
Vicky Kaushal Net Worth: आलिशान घर, महागड्या गाड्या, रॉयल लाईफस्टाईल... 'छावा' सिनेमा गाजवणारा विकी कौशल किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा हैराण करणारा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याची चर्चा...

Vicky Kaushal Net Worth: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. यंदाच्या वर्षातील बहूप्रतीक्षीत ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी सिनेमाने 31 कोटींचा गल्ला जमावला. सलग तिसऱ्या दवशी देखील सिनेमाच्या कमाईचा आकडा चढत्या क्रमावर आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाने 72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमात विकी याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका स्वीकारली आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
विकी कौशल याची नेटवर्थ…
विकी कौशल याने हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. फिल्मी कुटुंबातील नसून देखील विकीने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. विकी कौशल याच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 140 कोटींची संपत्ती आहे. सिनेमे, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता गडगंज कमाई करतो.




कोणत्याही सिनेमात मुख्य भूमिकेसाठी अभिनेता 10 ते 12 कोटी रुपये घेतात. मात्र, अभिनेत्याने ‘छावा’ सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. एन्डोर्समेंट आणि जाहिरातींसाठी विकी 2-3 कोटी रुपये घेतो.
View this post on Instagram
फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 यादीत विकीचा समावेश होता. सर्वसामान्य कुटुंबातील विकी आज त्याच्या आई – वडिलांसोबत रॉयल आयुष्य जगत आहे. अभिनेता आलिशान घरात त्याच्या कुटुंबासोबत राहतो.
विकी कौशल याचं कार कलेक्शन
विकी याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. ज्यामध्ये Mercedes-Benz GLE, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWB, BMW 5GT आणि Royal Enfield Continental GT 650 यांचा समावेश आहे.
विकी कौशल याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मसान’ सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विकीने आतापर्यंत अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. ‘सॅम बहादुर’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘बॅड न्यूज’, ‘डंकी’ यांसारख्या सिनेमात अभिनेत्याने दमदार भूमिका साकरत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं.