VIDEO: ‘छावा’ पाहून विद्यार्थ्यांनी म्हटली शिव गर्जना, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
सध्या सोशल मीडियावर चित्रपटगृहातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी शिव गर्जना म्हटली असल्याचे दिसत आहे.

सध्या सगळीकडे ‘छावा’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी देशभरातील प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तुफान गर्दी केली आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम केले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळकरी विद्यार्थी शिव गर्जना म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर नक्की काटा येईल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा तेलंगणामधील एका थिएटरमधील आहे. या थिएटरमध्ये सरस्वती शिशू मंदीर हायस्कूल कामारेड्डी मधील विद्यार्थ्यांना ‘छावा’ सिनेमा दाखवण्यासाठी आणले असल्याचे दिसत आहे. हे शाळकरी विद्यार्थी चित्रपट संपल्यानंतर शिव गर्जना म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.




View this post on Instagram
अनेकांनी हा व्हिडीओपाहून त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, ‘हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! अभिमानास्पद क्षण’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘हा व्हिडीओ पाहून मला एक प्रश्न पडला आहे की हे महाराष्ट्रामधील चित्रपटगृहामध्ये का घडत नाही. तेलंगणामधील या विद्यार्थांना माझा आशिर्वाद’ असे म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे. तिसऱ्या एका यूजरने शाळेच्या मॅनेजमेंटचे कौतुक केले आहे.
‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर हा सिनेमा १४ फेब्रुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यांसारख्या सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई ही ३१ कोटी रुपये होते. आता या कमाईमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. शिवजंयतीच्या मूहुर्तावर चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने सहा दिवसांमध्ये जवळपास ९७.७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.