अभिनेत्रीने 4 वर्षांच्या मुलासमोर बिकिनीमध्ये दिले पोझ; नेटकरी म्हणाले ‘निर्लज्जपणाचा कळस’!

छवीने काही दिवसांपूर्वीच कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी ती अभिनेत्री आहे.

अभिनेत्रीने 4 वर्षांच्या मुलासमोर बिकिनीमध्ये दिले पोझ; नेटकरी म्हणाले 'निर्लज्जपणाचा कळस'!
Chhavi MittalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 9:01 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओे पोस्ट करत ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. याशिवाय युट्यूबवरील व्लॉगद्वारेही ती तिच्या रोजच्या दिवसातील विविध घडामोडी चाहत्यांना सांगताना दिसते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून याच फोटोमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. या फोटोमध्ये छवी बिकिनी लूकमध्ये दिसत असून तिच्या समोर तिचा चार वर्षांचा मुलगासुद्धा उभा आहे. लहान मुलासमोर अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी छवीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

छवी मित्तल नेहमीच सोशल मीडियावर बेधडकपणे मतं मांडताना दिसते. यावेळी तिने बिकिनीतील फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिची मुलगी अरीजाने क्लिक केला आहे. मात्र याच फोटोवरून नेटकरी तिच्यावर टीका करू लागले आहेत. मात्र काहींनी यामध्ये छवीची बाजूही घेतली आहे. ‘हा आमचा प्रेमळ फोटोबॉम्बर अरहाम हुसैन माझ्यापासून दूर जाण्यास नकार देत आहे आणि मी खरंच सांगते की या गोष्टीने आमच्या अलिबागच्या संपूर्ण ट्रीपला आणखी मजेशीर बनवलं आहे’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

छवीच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिलं, ‘हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे’. तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘हे सगळं फक्त सोशल मीडियापुरतं आहे. महिलांना कमी कपड्यांमध्ये स्वीकार करणं म्हणजे त्यांचा आदर करणं असा अर्थ होत.’ तर काहींनी कमेंट्समध्ये छवीची बाजूसुद्धा घेतली आहे. ‘तू मुलांसमोर स्विमवेअर घालणं ज्याप्रकारे नॉर्मलाइज केलंस, ते मला आवडलं. यामुळे त्याला इतर मुली किंवा महिलांच्या कपड्यांबद्दल मतं न बनवण्याची शिकवण मिळेल’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिची बाजू घेतली.

छवीने काही दिवसांपूर्वीच कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी ती अभिनेत्री आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.