AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversy | ’24 तासांत प्रसारण थांबवा’, ‘बॉम्बे बेगम’ वेब सीरीजला सरकारकडून नोटीस! वाचा काय आहे प्रकरण..

चाईल्ड कमिशनने नेटिफ्लिक्सला त्यांच्या ‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरीजच्या कंटेंटविषयी नोटीस पाठवली आहे. तसेच, त्यांना पुढील 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Controversy | '24 तासांत प्रसारण थांबवा', ‘बॉम्बे बेगम’ वेब सीरीजला सरकारकडून नोटीस! वाचा काय आहे प्रकरण..
बॉम्बे बेगम
| Updated on: Mar 12, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : बॉलिवूडनंतर आता सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवण्याचे म्हटले आहे. तांडव वेब सीरीज वादानंतर सरकार या प्रकरणात वेगाने हालचाल करत आहे आणि अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर आता नेटफ्लिक्स सारख्या आणखी प्लॅटफॉर्मवर कठोर लक्ष ठेवताना दिसत आहे. यादरम्यान आता चाईल्ड कमिशनने नेटिफ्लिक्सला त्यांच्या ‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरीजच्या कंटेंटविषयी नोटीस पाठवली आहे. तसेच, त्यांना पुढील 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. नेटफ्लिक्सची ही वेब सीरीज 8 मार्च रोजी प्रदर्शित झाली होती. ज्यानंतर आता बाल आयोगाने हे कठोर पाऊल उचलले आहे (Child commission gives notice to Netflix for bombay begum web series controversial scenes).

चाईल्ड कमिशनने नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली असून ‘बॉम्बे बेगम’ने प्रसारण थांबवावे आणि पुढील 24 तासात अहवाल द्यावा, अशी नोटीस जारी केली आहे. बाल आयोगाकडे आलेल्या तक्रारी नुसार या वेब सीरीजमध्ये 13 वर्षाची लहान मुलगी ड्रग्ज घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यासह शालेय मुलांचे अतिशय चुकीचे चित्रण केले गेले आहे, यावरही आक्षेप घेण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉनवर सरकारने कारवाई केली होती!

यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर त्यांच्या ‘ तांडव’ या वेब सीरीजसाठी कारवाई केली गेली होती. ‘तांडव’ बद्दल बरीच गोंधळ उडाला होता. यानंतर अ‍ॅमेझॉनच्या वतीने या वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली.

नेटफ्लिक्स सीरीज ‘बॉम्बे बेगम’ ही अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केली आहे. या सीरीजमध्ये पाच वेगवेगळ्या महिलांची कहाणी दर्शवली गेली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने या वेब सीरीजमधून कमबॅक केले आहे. या वेब सीरीजमधील पूजा भट्ट व्यतिरिक्त सुहाना गोस्वामी, प्लाबिता बोर-ठाकूर, अधिया आनंद यांच्यासह अनेक मोठे चेहरे आहेत (Child commission gives notice to Netflix for bombay begum web series controversial scenes).

नेटफ्लिक्स 24 तासांत अहवाल सादर करावा लागेल

बाल हक्कांच्या संरक्षणासाठी एनसीपीसीआर ही सर्वोच्च संस्था आहे. वेब सीरीजचे प्रसारण थांबवण्यासाठी एनसीपीसीआरने नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. एनसीपीसीआरने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला 24 तासात सविस्तर कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आयोग असे म्हणतो की, नेटफ्लिक्स तसे न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

तक्रारीच्या आधारे कमिशनने नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली आहे. तक्रारीत असा आरोप केला गेला आहे की, या मालिकेत अल्पवयीन मुलांचे अनैतिक लैंगिक संबंध आणि त्यांनी मादक पदार्थांचे सेवन केल्याचे दाखवण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या मालिकेतल्या मुलांच्या कथित अनुचित चित्रणावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, अशा सामग्रीमुळे केवळ तरुणांच्या मनावर परिणाम होणार नाही तर, यामुळे मुलांचे शोषण देखील होऊ शकते.

(Child commission gives notice to Netflix for bombay begum web series controversial scenes)

हेही वाचा :

Priyanka Chopra | ऑस्कर नामांकित ‘बिट्टू’ला प्रियंका चोप्राचा मदतीचा हात, मुलींच्या शिक्षणावर म्हणाली…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.