Oscars 2023: ‘ती’ चपराक अजूनही विसरला नाही; ऑस्करचं सूत्रसंचालन करण्यास ख्रिस रॉकचा नकार

ख्रिस रॉकला पुढच्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. या घटनेची तुलना त्याने एखाद्या क्राईम सीनशी केली.

Oscars 2023: 'ती' चपराक अजूनही विसरला नाही; ऑस्करचं सूत्रसंचालन करण्यास ख्रिस रॉकचा नकार
ऑस्करचं सूत्रसंचालन करण्यास ख्रिस रॉकचा नकारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:22 PM

यावर्षी मार्च महिन्यात ऑस्कर (Oscars) पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यातील एक घटना चांगलीच गाजली. ती म्हणजे अभिनेता विल स्मिथने (Will Smith) सूत्रसंचालक ख्रिस रॉकला (Chris Rock) मारलेली चपराक. पत्नी जेडा पिंकेट स्मिथच्या टकलेची खिल्ली उडवल्याने विल स्मिथने मंचावर जाऊन ख्रिसच्या कानशिलात लगावली होती. ती चपराक ख्रिस अजूनही विसरलेला नाही. कारण नुकत्याच एका कार्यक्रमात त्याने ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करण्यास नकार दिल्याचं स्पष्ट केलं. ख्रिसच्या या वक्तव्यामुळे ऑस्करमधल्या त्या ‘थप्पड’ची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

ख्रिस रॉकला पुढच्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. या घटनेची तुलना त्याने एखाद्या क्राईम सीनशी केली. एका गुन्ह्याचं उदाहरण देत तो म्हणाला, “ऑस्कर शो पुन्हा होस्ट करणं म्हणजे ज्या ठिकाणी गुन्हा घडला, त्या ठिकाणाला परत भेट देण्यासारखं झालं.” फक्त ऑस्करच नाही तर सुपरबॉल कमर्शियलमध्येही सहभागी होणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.

विल स्मिथचा माफीनामा-

ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर विलने सोशल मीडियावर जाहीर माफीनामा पोस्ट केला होता. ‘कोणत्याही प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यातील माझं वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होतं. माझ्या खर्चावर विनोद करणं हा कामाचा एक भाग आहे असं मी समजू शकतो, परंतु जेडाच्या मेडिकल कंडिशनबद्दल विनोद केलेलं मला सहन झालं नाही आणि भावनेच्या अधीन झाल्याने मी तसा वागलो. मला जाहीरपणे तुझी माफी मागायची आहे ख्रिस. माझी वागणूक मर्यादेपलीकडची होती आणि मी चुकलो,’ अशा शब्दांत त्याने माफी मागितली.

हे सुद्धा वाचा

विल स्मिथने घडलेल्या घटनेबद्दल दोनदा माफी मागितली. परंतु तरीही ख्रिस हे सर्व विसरायला तयार नाही असं दिसतंय. या घटनेनंतर विलला अकॅडमीने 10 वर्षांसाठी बंदी घातली आहे. पुढील 10 वर्षे तो अकॅडमीच्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकणार नाही.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.