Shirish Kanekar | वाचकांना निखळ आनंद देणारा ‘ कणेकरी’ हरपला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शोक

शिरीष कणेकर बहुआयामी-बहुपेडी व्यक्तीमत्व होते. त्यांच्यासारखा अवलिया होणे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना आदरांजली वाहिली.

Shirish Kanekar | वाचकांना निखळ आनंद देणारा ' कणेकरी' हरपला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शोक
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 4:25 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांना श्रद्धांजली वाहिली. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

प्रख्यात सिने समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात नमूद केले.

कणेकर हे बहुआयामी-बहुपेडी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात पत्रकार, चित्रपट व क्रिकेट समीक्षक, ललित लेखक, एकपात्री कलाकार अशा एकाहून अनेक कला-गुणांचा दुर्मीळ असा मिलाफ होता. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलासक्त होते. त्यामुळे त्यांच्याशीही कणेकर यांचे स्नेहबंध होते. कणेकरांच्या हजरजबाबी आणि हरहुन्नरही व्यक्तिमत्वामुळे ते जिथे-जिथे जातील तिथे हास्याची लकेर उमटत असे. चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातील अनेक घडामोडींचा त्यांचा बारकाईने अभ्यास असे. विसंगती आणि किश्श्यांतून ते हास्याची कारंजी फुलवत राहीले.

त्यांनी स्वतःला कुठल्याही क्षेत्राचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अष्टपैलू खेळाडुसारखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मैदानात कामगिरी करून ठेवली आहे. त्यांनी फटकेबाजीही केली आणि आणि विकेटही उडवल्या आहेत. अशी कामगिरी कुणी यापुर्वी केली नव्हती, आणि यापुढेही शक्य नाही. स्तंभलेखन, पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी चौफेर लेखन केले. त्यांच्या पुस्तकांची नावंही मिश्किल आणि दिलखुलास स्वभावाप्रमाणे खट्याळ-अवखळ अशी वैशिष्ट्यपूर्ण राहीली आहेत. या साहित्यनिर्मितीतून, वैशिष्ट्यपूर्ण एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणातून त्यांनी विदेशातही लोकप्रियता मिळवली. यातूनही त्यांनी मराठी साहित्याचे वैभव, बहुविविधता जागतिकस्तरावर पोहचवली आहे. त्यांच्यासारखा अवलिया होणे नाही. कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा या बहुआयामी महाराष्ट्र सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – अजित पवार

शिरीष कणेकरांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, त्यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक, व्यासंगी पत्रकार, मनस्वी कलावंत, दिलखुलास व्यक्तिमत्व हरपलं अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरीष कणेकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, तसेच सिनेमा वेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या अजरामर साहित्यकृती तसंच कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील. शिरीष कणेकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार यांनी त्यांच्या शोकसंदेशात नमूद केले.

खास शैलीतील लेखनातून वेगळा ठसा उमटवणारा दिलखुलास लेखक काळाच्या पडद्याआड – छगन भुजबळ

भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या क्रिकेट व सिनेमा या विषयांवर, तसेच राजकारणावर विविध माध्यमांतून लेखन करणारे ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! एक उत्तम कथाकथनकार, पत्रकार आणि विनोदी व खास शैलीतील लेखनातून आपला वेगळा ठसा उमटविणारा दिलखुलास लेखक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !, अशा शब्दांत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी कणेकरांना श्रद्धांजली वाहिली.

शिरीष कणेकर यांच्या निधनामुळे साहित्य विश्वाचे नुकसान – राज्यपाल रमेश बैस

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि भाष्यकार शिरीष कणेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले. उत्तम पत्रकार असलेले शिरीष कणेकर मिश्किल, हरहुन्नरी व विनोदी लेखक तसेच प्रभावी वक्ते होते. कणेकर यांनी अखेरपर्यंत स्तंभलेखन केले आणि आपल्या खुमासदार शैलीने वाचकांचे तसेच श्रोत्यांचे मनोरंजन केले.

क्रिकेट आणि हिंदी चित्रपटसृष्टी या दोन विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि सांस्कृतिक विश्वाचे नुकसान झाले आहे. दिवंगत कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.