ट्रॅफिकमध्ये अडकला पायलट? ‘इंडिगो’ एअरलाइनवर भडकला कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्मा चेन्नईहून मुंबईला इंडिगो विमानाने प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याला आलेला वाईट अनुभव त्याने सोशल मीडियावर सांगितला. इंडिगो या एअरलाइनच्या सेवेवर त्याने तीव्र संताप व्यक्त केला. पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याने विमानाला उशीर झाल्याचं कारण त्यांनी दिलं होतं.

ट्रॅफिकमध्ये अडकला पायलट? 'इंडिगो' एअरलाइनवर भडकला कपिल शर्मा
Kapil SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 8:27 AM

मुंबई : 30 नोव्हेंबर 2023 | कॉमेडियन कपिल शर्माने बुधवारी ‘इंडिगो’ एअरलाइनच्या सेवेवर तीव्र संताप व्यक्त केला. प्रवासासाठी उशीर झाल्याचा आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याचा आरोप त्याने केला. इंडिगो ही देशातील सर्वांत मोठी व्यावसायिक एअरलाइन म्हणून ओळखली जाते. मात्र कपिल शर्माला या एअरलाइनने प्रवास करताना अत्यंत वाईट अनुभव आला. याविषयी त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राग व्यक्त केला आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जवळपास तासभर शटल बसमध्ये प्रतीक्षा करावी लागली. आश्चर्याची बाब म्हणजे विमानाचा पायलट हा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने प्रवाशांना तासभर बसून राहावं लागलं होतं. कपिलने काही प्रवाशांचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये संतप्त प्रवासी एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत.

कपिल शर्माची पोस्ट-

‘प्रिय इंडिगो, आधी तुम्ही आम्हाला बसमध्ये 50 मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करायला लावलं आणि नंतर तुमची टीम सांगतेय की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. काय? खरंच? रात्री 8 वाजता आमच्या विमानप्रवासाला सुरुवात झाली पाहिजे होती. पण आता 9.20 वाजले आहेत आणि अद्याप पायलट पोहोचलेला नाही. तुमच्यामुळे त्रास सहन करणारे हे 180 प्रवासी पुन्हा इंडिगोने प्रवास करतील असं तुम्हाला वाटतं का? कधीच नाही’, अशा शब्दांत कपिलने राग व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

यानंतर कपिलने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये प्रवाशांना विमानातून बाहेर उतरवलं जात आहे. ‘आता ते विमानातून प्रवाशांना बाहेर काढत आहेत आणि दुसऱ्या एअरक्राफ्टमध्ये पाठवणार असल्याचं सांगत आहेत. पण आता आम्हाला पुन्हा एकदा टर्मिनलवर सेक्युरिटी चेकसाठी जावं लागणार. लोकांना तुमच्यामुळे त्रास सहन करावा लागतोय आणि इंडिगो आमच्याशी फक्त आणि फक्त खोटंच सांगतेय. प्रवाशांमध्ये काही वयोवृद्ध आणि काही व्हिलचेअरवर आहेत, ज्यांची प्रकृती ठीक नाही. खरंच तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, अशी तक्रार कपिलने केली. कपिलने ‘एक्स’वर (ट्विटर) इंडिगो एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनाही टॅग केलं आहे. चेन्नई ते मुंबई प्रवासादरम्यान हा त्रास सहन करावा लागल्याचं त्याने नमूद केलं.

एखाद्या एअरलाइनकडून प्रवाशांची अशा प्रकारे गैरसोय झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही बऱ्याच सेलिब्रिटींना अशा पद्धतीना अनुभव आला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे एअरलाइनची तक्रार केली. कपिल शर्माच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत एअरलाइनवर संताप व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.