मामा गोविंदानंतर आता कृष्णा अभिषेक उचलणार मोठे पाऊल, मामी सुनिताला..

अभिनेत्री आरती सिंहचे लग्न नुकताच पार पडले. विशेष म्हणजे आरती सिंहच्या लग्नाला अनेक स्टारने हजेरी लावली. आरतीच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आरती सिंहच्या लग्नाला मामा गोविंदा हा देखील पोहचला.

मामा गोविंदानंतर आता कृष्णा अभिषेक उचलणार मोठे पाऊल, मामी सुनिताला..
krushna abhishek
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 11:55 AM

टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिचे नुकताच लग्न झाले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर जबरदस्त लूकमध्ये आरती दिसत होती. बिझनेसमॅनसोबत आरती सिंहने लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाला अभिनेता गोविंदा हा देखील पोहचला. गेल्या काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामध्ये वाद बघायला मिळाला. हेच नाही तर मुलाखतीमध्येच गोविंदा आणि मामी सुनिता हे कृष्णा अभिषेक याच्यावर संताप व्यक्त करताना दिसले. अनेक वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा एकमेकांना बोलत देखील नव्हते.

शेवटी आरती सिंहच्या लग्नाला जुने वाद सोडून मामा गोविंदा हा पोहचला होता. भाची आरती सिंहला नवरीच्या लूकमध्ये पाहून गोविंदा हा भावूक होताना देखील दिसला. गोविंदाचे आर्शिवाद घेताना कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा हे देखील दिसले. कृष्णा अभिषेकच्या मुलांना देखील आर्शिवाद देताना गोविंदा हा दिसला आहे. आरतीच्या लग्नाला गोविंदा आल्याने चाहतेही आनंदी झालेत.

आता नुकताच कृष्णा अभिषेक याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना कृष्णा अभिषेक दिसलाय. कृष्णा अभिषेक म्हणाला की, मला माहिती होते की, मामा आरतीच्या लग्ना येणार. आरतीला पाहून मामा भावूक झाला. लग्नामध्ये मी मामाला फार काही बोलू शकतो नाही, पण मी आता मामाच्या घरी जाणार आहे.

हे सर्व आता बस झाले असून मी घरी जाईल आणि मामी सुनिताने किती रागावले तरीही सर्व ऐकून घेईल, कारण तो त्यांचा अधिकार आहे. मामा आणि मामीने लहानपणी आम्हाला आई वडिलांसारखे सांभाळले आहे. प्रत्येक अडचणीमध्ये ते आमच्यासोबत होते. वय कमी असतानाच आई वडील सोडून केले, त्यानंतर त्यांनीच आमच्या सांभाळ केलाय.

आरतीच्या लग्नामध्येच आता सर्व राग रूसवे गेले आहेत. मी सात ते आठ वर्षे झाले मामाला भेटलो नव्हतो. पण आता मी त्यांच्या घरी जाणार आहे. पुढे कृष्णा अभिषेक म्हणाला की, लग्नाला मामी आणि त्यांची मुलगी आले असते तर अजून छान वाढले असते. परंतू आता सुरूवात नक्कीच झालीये. आता हा सर्व वाद संपवायचा असल्याचे सांगतानाही कृष्णा अभिषेक हा दिसला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.