लव्ह, लग्न अन् घटस्फोट.. पियुष रानडेचं वादग्रस्त खासगी आयुष्य

अभिनेता पियुष रानडेचं पहिलं लग्न 4 वर्षांत तर दुसरं लग्न काही महिन्यांतच संपुष्टात आलं होतं. आता अभिनेत्री सुरुची अडारकरशी त्याने तिसऱ्यांदा लग्न केलंय. पुण्यात मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. मात्र या लग्नानंतर पियुषचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

लव्ह, लग्न अन् घटस्फोट.. पियुष रानडेचं वादग्रस्त खासगी आयुष्य
Piyush Ranade and Suruchi AdarkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 10:36 AM

मुंबई : 7 डिसेंबर 2023 | अभिनेता पियुष रानडे हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. पियुष त्याच्या ऑनस्क्रीन भूमिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच त्याने अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं आहे. बुधवारी सुरुची आणि पियुषने सोशल मीडियावर थेट लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या लग्नामुळे पियुषच्या खासगी आयुष्याकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. पियुषने वयाच्या 40 व्या वर्षी सुरुचीसोबत तिसरं लग्न केलं आहे. याआधी त्याने शाल्मली तोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे दोन्ही लग्न फार काळ टिकलं नाही.

2010 मध्ये पियुषने फॅशन स्टायलिस्ट शाल्मली तोळ्येशी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय गेतला. 2014 मध्ये पियुषने शाल्मली घटस्फोट दिला. यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर पियुषने जानेवारी 2017 मध्ये अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न केलं. ‘अस्मिता’ या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर पियुष आणि मयुरीने लग्नाचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

दुर्दैवाने पियुषच्या दुसऱ्या लग्नातही समस्या निर्माण झाल्या. लग्नाच्या काही महिन्यांतच मयुरी आणि पियुषने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी घटस्फोट का घेतला, यामागचं कारण कधीच समोर आलं नाही. मयुरीला घटस्फोट दिल्यानंतर पियुषचं नाव मीरा सारंगसोबतही जोडलं गेलं होतं. आता अखेर त्याने अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

6 डिसेंबर रोजी पुण्यात या दोघांनी लग्न केलं. “मी खूप खुश आहे आणि माझा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही. माझ्यासाठी ही भावना खूप जादुई आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका खूप चांगल्या व्यक्तीशी लग्न केलं. पियुष खूप भावनिक आणि काळजी घेणार आहे. त्याच्याशी लग्न केल्याबद्दल मी स्वत:ला नशिबवान समजते”, अशा शब्दांत सुरुचीने भावना व्यक्त केल्या. या लग्नाविषयी दोघांनी कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. याविषयी बोलताना सुरुची पुढे म्हणाली, “मला माझ्या खासगी आयुष्यातील गोष्टी उघड करायला आवडत नाही. त्यामुळे आमच्या नात्याप्रमाणेच मी लग्नाचीही गोष्ट उघड केली नाही. या लग्नसोहळ्याला फक्त आमचे कुटुंबीय उपस्थित होते.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.