इंटिमेट सीन शूट करताना जया प्रदा यांनी लगावली कानशिलात? बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्याने सोडलं मौन

अभिनेते दलिप ताहिल यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. अशाच एका चित्रपटात इंटिमेट सीन शूट करताना मर्यादा ओलांडल्याने जया प्रदा यांनी त्यांना कानाखाली मारल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांवर बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी मौन सोडलं आहे.

इंटिमेट सीन शूट करताना जया प्रदा यांनी लगावली कानशिलात? बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्याने सोडलं मौन
Dalip Tahil and Jaya PradaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 8:36 AM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री जया प्रदा यांनी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते दलिप ताहिल यांच्या कानाखाली मारल्याची चर्चा होती. या चर्चांवर बऱ्याच वर्षांनंतर दलिप यांनी प्रतिक्रिया दिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मोकळेपणे व्यक्त झाले. एका चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान दलिप यांनी त्यांची मर्यादा ओलांडली आणि त्यामुळेच जया प्रदा यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याची चर्चा होती. यावर प्रतिक्रिया देताना दलिप ताहिल हसले आणि आश्चर्य व्यक्त करत म्हणाले की, “अशा चर्चा कुठून येतात? कारण मी त्यांच्यासोबत कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही.”

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी जेव्हा माझ्यासंदर्भातील असे वृत्त वाचले होते, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला होता. मी जया प्रदाजी यांचा खूप आदर करतो आणि त्या सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. पण मला हाच प्रश्न पडतोय की असा कोणता चित्रपट होता? जर एखाद्याने चित्रपटाचं नाव सांगितलं तर मला समजू शकेल. पण माझ्या माहितीनुसार, मी जया प्रदाजींसोबत एकाही चित्रपटात काम केलं नाही.”

चर्चांवर काय म्हणाले दलिप?

इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान मर्यादा ओलांडल्याच्या चर्चांना फेटाळत असतानाच दलिप यांनी महिलांसाठी मनात खूप आदर असल्याचं स्पष्ट केलं. सेटवरील अभिनेत्रींच्या बाजूने नेहमीच उभा राहिल्याचं त्यांनी सांगितलं. किंबहुना अनेकदा दिग्दर्शक त्यांना सांगायचे की इंटिमेट सीन शूट करताना तुम्ही तुमच्या कलेनं सर्व गोष्टी सांभाळा. अशा वेळी याबद्दलची माहिती सहकलाकारांना देऊन ठेवा, अशा सूचना ते दिग्दर्शकांना द्यायचे. “कलाकारांमध्ये आदरपूर्वक मर्यादा असावी असं माझं मत आहे. मी नेहमीच मर्यादा ओलांडण्याच्या विरोधात होतो आणि यासाठी मी चित्रपटातून माघार घेण्याची धमकीसुद्धा दिग्दर्शकांना दिली होती”, असं दलिप यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

या मुलाखतीत दलिप यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचाही अनुभव सांगितला. त्यांनी सांगितलं की सेटवर अमिताभ बच्चन यांना पाहून ते त्यांचा डायलॉगच विसरले होते. “आम्ही वांद्रे याठिकाणी आंबेडकर रोडवर शूटिंग करत होतो आणि तो माझा पहिला व्यावसायिक चित्रपट होता. चित्रपटातील त्या सीनमध्ये मला खलनायक गँगमधील एक सदस्य म्हणून दाखवण्यात आलं होतं. जो दाढी करत असतो आणि त्याचवेळी बच्चन साहेब येऊन त्याच्या मानेवर चाकू धरतात”, असं त्यांनी सांगितलं.

याविषयी ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी सेटवर प्रतीक्षा करत होतो, तेव्हा मला मागून आवाज आला की, हाय मी मिस्टर अमिताभ बच्चन. त्यांना पाहून आणि आवाज ऐकून अचानक माझी तब्येत बिघडली. थिएटरमध्ये काम केल्याने मला खात्री होती की मी तो सीन चांगल्या पद्धतीने शूट करू शकेन. पण खऱ्या अर्थाने जेव्हा मी त्यांच्यासमोर उभा राहिलो तेव्हा सर्वच गडबड झाली होती. मी माझे डायलॉग विसरत होतो. त्यावेळी बिग बींनी मला समजून घेतलं. मला शांत होण्यासाठी त्यांनी थोडा वेळ दिला. माझ्या पद्धतीने त्यांनी मला तो सीन शूट करू दिला.”

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.