वर्ष होण्याआधीच प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं दुसरं लग्न? परदेशातून परतली भारतात

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र आता तिने सोशल मीडियावरील पतीसोबतचे सर्व फोटो डिलिट केले असून त्याचं आडनावसुद्धा हटवलं आहे.

वर्ष होण्याआधीच प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं दुसरं लग्न? परदेशातून परतली भारतात
Dalljiet Kaur Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 8:00 AM

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौरने गेल्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दलजीतने निखिल पटेलशी लग्न केलं आणि लग्नानंतर ती मुलगा जेडनसोबत केन्याला राहायला गेली. निखिल हा केन्यातील फायनान्स सेक्टरमध्ये काम करत असून दलजीत सुटट्यांमध्ये तिथे फिरायला गेली असताना दोघांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लग्नाला वर्षही पूर्ण झालं नसताना दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील निखिलसोबतचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. इतकंच नव्हे तर तिने तिच्या अकाऊंट्या बायोमधून पतीचं आडनावसुद्धा हटवलं आहे. त्यामुळे दलजीत आणि निखिल घटस्फोट घेत आहेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नोव्हेंबर 2023 पर्यंत या दोघांमध्ये सर्व गोष्टी ठीक होत्या. मग अचानक कुठे काय बिनसलं, असे सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. आता दलजीत तिच्या मुलासोबत भारतात परतली आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीतच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “दलजीत आणि तिचा मुलगा जेडन हे भारतात तिच्या आईवडिलांच्या सर्जरीनिमित्त आले आहेत. त्यामुळे ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही”, असं म्हटलं गेलंय. त्याचप्रमाणे दोघांच्या मुलांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती नेटकऱ्यांना करण्यात आली आहे. निखिल पटेलला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. तो मूळचा लंडनचा असून केन्यामध्ये कामानिमित्त स्थायिक आहे.

हे सुद्धा वाचा

फक्त दलजीतनेच नाही तर निखिलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दलजीतसोबतचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. त्याने फक्त त्याच्या दोन्ही मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर तसेच ठेवले आहेत. याआधी दलजीतने अभिनेता शालीन भनोतशी लग्न केलं होतं. त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत दलजीतने शालीनला घटस्फोट दिला होता. 2015 मध्ये हे दोघं विभक्त झाले. जेडन हा दलजीत आणि शालीन यांचाच मुलगा आहे.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.