Dancing Queen : ‘डान्सिंग क्विन’चा महाअंतिम सोहळा, प्रणाली चव्हाण ठरली पहिल्या वजनदार पर्वाची विजेती
जगातील पहिल्या वजनदार पर्वाची विजेती ठरली प्रणाली चव्हाण. (Dancing Queen's grand finale, Pranali Chavan becomes winner)
मुंबई : थोडं जास्त थोडं एक्स्ट्रा सगळयांनाच आवडतं त्यासाठी झी मराठीनं ‘डान्सिंग क्विन साईज लार्ज, फुल चार्ज’ असा एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये प्रेक्षकांसाठी होता Extra तडका, Extra सॉलिड डान्स आणि धमाल मनोरंजन. हा कार्यक्रम जगातील पहिला वजनदार डान्सिंग शो ठरला आहे. यामध्ये 15 वर्ष आणि त्यावरील 70 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.या वजनदार स्पर्धकांचं परिक्षण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि RJ मलिष्का यांनी केलं. नुकतच या डान्सिंग क्विन, साईज लार्ज फुल चार्ज चा ‘महाअंतिम सोहोळा’पार पडलाय.
जगातील पहिल्या वजनदार पर्वाची विजेती प्रणाली चव्हाण पुण्याची ‘प्रणाली चव्हाण’ ही या पहिल्या वजनदार पर्वाची विजेती ठरली . प्रणाली ही एक आर्किटेक्ट असून ती कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत होती मात्र डान्सचं वेड तिला स्वस्थ बसू देत नव्हतं, याच डान्सच्या वेडेपणानं सुरु झालेला तिचा प्रवास आज तिला ‘डान्सिंग क्विन साईज लार्ज, फुल चार्ज’ ची विजेती बनवून गेलाय.
अहमदनगरची ‘स्नेहा देशमुख’ ठरली 1st Runner Up तर या पर्वात 1st Runner Upचा मान अहमदनगरच्या स्नेहा देशमुखनं पटकावला आहे. स्नेहाची कहाणी एकदम चकित करणारी आहे. मराठी मालिकांमध्ये महत्वाचे पात्र या आधी स्नेहानं साकारले आहेत. स्नेहानं वजन कमी करणाऱ्या औषधांचं सेवन केलं होतं आणि त्या औषधाचा साईड इफेक्ट झाला, त्यामुळे स्नेहाचं वजन वाढलं. मुळात आई भरतनाट्यम शिक्षिका असल्यानं डान्स तिच्या घरातच होता. त्यामुळे आपल्या वाढलेल्या वजनाचा योग्य पद्धतीनं उपयोग करत ती डान्सिंग क्विनची 1st Runner Up ठरली आहे.
2nd Runner Up ठरली चेंबूरची ‘अपूर्वा उंडाळकर’ नेहमीच आपल्या करिअरला जास्त महत्व देणारी अपूर्वा उंडाळकर या पर्वाची 2nd Runner Up ठरली आहे. अपूर्वाचा या स्पर्धेतील प्रवास प्रचंड कठीण ठरला. स्पर्धा सुरू असतानाच तिच्या आईचं दुख:द निधन झालं मात्र अपूर्वा डगमगली नाही. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिनं अधिक जिद्दीनं डान्स केला आणि ती डान्सिंग क्विनच्या या पर्वात बाजी मारली.
‘डान्सिंग क्विन साईज लार्ज, फुल चार्ज’ च्या यापर्वाचा महाअंतिम सोहळा झी मराठीवर 27 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता प्रकाशित होणार आहे.