दीपक तिजोरीची कोट्यवधींची फसवणूक; ‘आशिकी’ फेम अभिनेत्याकडून गुन्हा दाखल

अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2003 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. जवळपास 33 वर्षांनंतर दीपकने नादर यांच्यासोबत मिळवून 'टिप्सी' या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली होती.

दीपक तिजोरीची कोट्यवधींची फसवणूक; 'आशिकी' फेम अभिनेत्याकडून गुन्हा दाखल
Deepak TijoriImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 11:59 AM

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरीसोबत फसवणुकीची घटना घडली आहे. याप्रकरणी त्याने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीपक तिजोरीने त्याच्या तक्रारीत खुलासा केला की त्याच्यासोबत कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीचा आरोप त्याने सहनिर्माता मोहन नादर यांच्यावर लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दीपिक तिजोरीची तक्रार लिखित स्वरुपात दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 10 दिवसांपूर्वीचं आहे. निर्माते मोहन नादर यांच्याकडून पैसे मिळाले नसल्याची तक्रार दीपिकने केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दीपकने एक थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी मोहन नादरशी हातमिळवणी केली होती. याचसाठी त्याने 2.6 कोटी रुपये मोहन यांना दिले होते. दीपिकच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

2019 मध्ये दीपक आणि मोहन नादर यांनी एक कॉन्ट्रॅक्ट तयार करून त्यावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अनेकदा विचारूनही नादर यांनी दीपकचे पैसे परत केले नाही. 2019 मध्ये दीपकने त्यांना शूटिंगसाठी कोट्यवधी रुपये दिले होते. हे पैसे लवकरच परत करणार असल्याचं आश्वासन नादर यांनी दिलं होतं. मात्र नंतर विविध कारणं देत त्यांनी पैसे परत करणं टाळलं आणि दिलेले चेकसुद्धा बाऊन्स झाले.

दीपकने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2003 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. जवळपास 33 वर्षांनंतर दीपकने नादर यांच्यासोबत मिळवून ‘टिप्सी’ या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली होती. आशिकी, खिलाडी, जो जिता वही सिकंदर, कभी हा कभी ना, अंजाम, गुलाम, बादशाह यांसारख्या चित्रपटांमध्ये दीपकने सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. 1993 मध्ये ‘पहला नशा’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये पूजा भट्ट आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.