Deepika Padukone | लग्नाबाबत दीपिका पादुकोणने चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला; रणवीरसाठी लिहिली पोस्ट

दीपिकाने पती रणवीर सिंगसाठी ही खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लग्नाबद्दल चाहत्यांना लाखमोलाचा सल्ला दिला आहे. दीपिकाने ही पोस्ट शेअर करताच त्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Deepika Padukone | लग्नाबाबत दीपिका पादुकोणने चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला; रणवीरसाठी लिहिली पोस्ट
Ranveer Singh and Deepika Padukone Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 10:09 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दरवर्षी ‘मैत्रीचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेनिमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे आपल्या खास मित्रमैत्रिणींसोबत फोटो शेअर केले तर काहींनी पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या. अशातच अभिनेत्री दीपिका पादुकोणची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. दीपिकाने पती रणवीर सिंगसाठी ही खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लग्नाबद्दल चाहत्यांना लाखमोलाचा सल्ला दिला आहे. दीपिकाने ही पोस्ट शेअर करताच त्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काय आहे दीपिकाची पोस्ट?

‘तुमच्या जिवलग मित्राशी लग्न करा. हे मी असंच हलक्यात बोलत नाहीये. खरंच, तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल, त्या व्यक्तीमध्ये सर्वांत मजबूत आणि आनंदी मैत्री शोधा. अशी व्यक्ती जी तुमच्याबद्दल भरभरून बोलू शकते, ज्याच्यासोबत तुम्ही मनसोक्त हसू शकता. अगदी पोट दुखेपर्यंत आणि नाकातून आवाज येईपर्यंतचं ते मनसोक्त हास्य असावं. जे थोडंसं लाजिरवाणं, तितकंच प्रामाणिक आणि तुमच्या मनाला समाधान देणारं असावं. समजूतदारपणाही महत्त्वाचा आहे. अशी व्यक्ती जी तुम्हाला त्यांच्यासोबत असताना मूर्खपणा करण्याचीही मुभा देते, त्यांच्यावर प्रेम न करण्यासाठी आयुष्य खूप छोटं आहे’, असं तिने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

त्या व्यक्तीबद्दल तिने पुढे म्हटलंय, ‘खात्री करून घ्या की ती अशी व्यक्ती असावी जी तुम्हाला मनमोकळेपणे रडू देईल. निराशा येईल. अशी व्यक्ती शोधा जी त्या काळात तुमच्यासोबत राहील. सर्वांत महत्त्वाचं म्हणते, उत्कटता, प्रेम आणि वेडेपणा या सर्वांना जोडून त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या व्यक्तीशी लग्न करा. असं प्रेम जे खोल किंवा गढूळ पाण्यातही आपलं अस्तित्त्व गमावणार नाही.’

दीपिकाच्या या पोस्टवर रणवीरने नजर न लागण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हाचा इमोजी पोस्ट केला आहे. त्याचसोबत हृदय आणि इन्फिनिटीचा इमोजी त्याने पोस्ट केला आहे. आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप, नादिया हुसैन खान यांसारख्या सेलिब्रिटींनीही दीपिकाच्या या पोस्टवर हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टवर साडेपाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.