AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोणने दिली ‘गुड न्यूज’; गणेशोत्सवात गोंडस बाळाला दिला जन्म

अभिनेत्री दीपिका पादुकोणने गणेशोत्सवात चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला असून ती आणि रणवीर सिंह आता आई-बाबा झाले आहेत. शनिवारी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दीपिका पादुकोणने दिली 'गुड न्यूज'; गणेशोत्सवात गोंडस बाळाला दिला जन्म
दीपिका पादुकोण, रणवीर सिंहImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 1:17 PM

गणेशोत्सव काळात अभिनेत्री दीपिका पादुकोणने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (8 सप्टेंबर) दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी दीपिकाला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रविवारी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर बेबी बंप दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. इतकंच नव्हे तर जेव्हा दीपिका बेबी बंपसह दिसली, तेव्हासुद्धा ते ‘फेक’ असल्याची टीका काहींनी केली. काही दिवसांपूर्वीच मॅटर्निटी फोटोशूटचे काही खास फोटो पोस्ट करत दीपिकाने त्या सर्व ट्रोलर्सना अखेर सडेतोड उत्तर दिलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नंसी जाहीर केल्यापासून दीपिका तिच्या विविध प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे. गरोदरपणात तिने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्यप्रसाधनाच्या प्रॉडक्ट्सची जाहिरातसुद्धा ती करत होती. इतकंच नव्हे तर गरोदरपणात ती काय खात होती आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करत होती, याविषयी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांन सांगितलं होतं. रणवीर आणि दीपिकाने नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्न केलं होतं. लग्नाआधी हे दोघं जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. तर लग्नाच्या सहा वर्षांनी दीपिका आणि रणवीर आई-बाबा झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार असल्याचं कळतंय. दीपिका-रणवीर हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या शेजारीच आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरने त्याचे वडील जगजीत सिंह भवनानी यांच्या कंपनीसोबत मिळून एक आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केलंय. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 110 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. किंग खानच्या ‘मन्नत’ जवळच हे अपार्टमेंट आहे.

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.