Fighter Trailer | ‘दिखाना पडेगा बाप कौन हैं’, पुलवामाचा बदला, अंगावर रोमांच आणणाऱ्या फायटरचा ट्रेलर लॉन्च

Fighter Trailer | पुलवामाचा हल्ला आजही भारतीय विसरलेले नाहीत. त्या हल्ल्यात भारताने आपले अनेक बहाद्दूर जवान गमावले होते. या घटनेनंतर भारताने जे केलं, ते पाकिस्तान कधीही विसरणार नाही. आता हाच सगळा घटनाक्रम फायटर चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या फायटरचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च झालाय.

Fighter Trailer | 'दिखाना पडेगा बाप कौन हैं', पुलवामाचा बदला, अंगावर रोमांच आणणाऱ्या फायटरचा ट्रेलर लॉन्च
Fighter Trailer
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 1:06 PM

Fighter Trailer | ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाची चर्चा आहे. फॅन्स आपल्या सुपरस्टार्सचा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक्त आहेत. 10 जानेवारीला ऋतिकच्या वाढदिवशी मेकर्सनी चित्रपटाचा ट्रेलर कुठल्यादिवशी रिलीज होणार, याचा खुलासा केला होता. आता प्रतिक्षा संपलीय. फिल्मचा ट्रेलर रिलीज झालाय. 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 3 मिनट, 09 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये दीपिका आणि ऋतिकच्या रोलची झलक दिसतेय. चित्रपटाचा दमदार टीजर, गाणी आणि पोस्टर आधीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.

आता ट्रेलरही तसाच आहे. ट्रेलरची सुरुवातच एका जबरदस्त डायलॉगने झालीय. त्यामुळे हा सिनेमा पाहण्याची तुमची उत्सुक्ता वाढेल. ट्रेलरमध्ये मेकर्सनी एअर स्ट्राइकचची झलक दाखवलीय, निश्चिच मोठ्या पडद्यावर धमाका दिसून येईल.

एकापेक्षाएक सरस डायलॉग

या चित्रपटात Action सोबत ऋतिक आणि दीपिकाचा रोमान्स सुद्धा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. एकापेक्षाएक सरस डायलॉग तुम्हाला एडवान्स बुकिंगसाठी भाग पाडतील. 14 जानेवारीला ऋतिक रोशनने त्याच्या टि्वटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने एक छोटीशी टीजर क्लिप शेअर करुन आज 15 जानेवारीला दुपारी 12 वाजता ट्रेलर लॉन्च होईल असं सांगितलं होतं. ट्रेलरमध्ये दीपिका आणि ऋतिकची केमिस्ट्री दिसून आलीय. सहाजिक प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन होईल. एवरग्रीन स्टार अनिल कपूर यांच्या दमदार अभिनयाने ट्रेलर अजूनच इंटरेस्टिंग बनवलाय.

काय आहे ट्रेलरमध्ये?

डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांनी कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. पुलवामा हल्ल्याची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष पहायला मिळेल. ऋतिक रोशन फायटर मध्ये स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया ऊर्फ पॅटीच्या भूमिकेत दिसेल. दीपिका पादुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठौड़ ऊर्फ मिन्नीच्या भूमिकेत दिसेल. या दोन सुपरस्टारशिवाय अनिल कपूर सुद्धा आहेत. ते ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंह ऊर्फ रॉकीच्या रोलमध्ये आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.