AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीरने हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण दीपिकाने केलं दुर्लक्ष; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले ‘काहीतरी बिनसलंय’

काही दिवसांपूर्वीही रणवीर-दीपिकाच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. चित्रपट समिक्षक उमैर संधू यांनी रणवीर-दीपिकाच्या नात्याबद्दल ट्विट केलं होतं. ‘ब्रेकिंग, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात काही आलबेल नाही’, असं ट्विट त्यांनी केलं.

रणवीरने हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण दीपिकाने केलं दुर्लक्ष; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले 'काहीतरी बिनसलंय'
Ranveer Singh and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:06 AM

मुंबई : गुरुवारी मुंबईत ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही नामांकित सेलिब्रिटी हे कार्यक्रमाला पुरस्कार प्रस्तुत करण्यासाठी आले होते. त्यात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगसोबत दीपिका पदुकोणच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं. दीपिका आणि रणवीर एकत्र ब्लॅक आऊटफिटमध्ये रेड कार्पेटवर आले, मात्र यावेळी असं काही घडलं जे पाहून नेटकऱ्यांमध्ये दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली.

रेड कार्पेटवर फोटो क्लिक करण्यासाठी रणवीर आणि दीपिका कारमधून उतरले. उतरल्यानंतर रणवीरने दीपिकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपिकाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल आणि पुढे निघून गेली. पापाराझीच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कारमध्ये उतरल्यानंतर रणवीर दीपिकाची वाट बघताना दिसतो. दीपिका कारमधून बाहेर आल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांसोबत बोलते. रेड कार्पेटच्या दिशेने जात असताना रणवीर दीपिकासमोर आपला हात पुढे करतो. मात्र दीपिका त्याच्याकडे दुर्लक्ष करून समोर चालत जाते. त्यानंतर रणवीरसुद्धा रेड कार्पेटच्या दिशेने चालू लागतो.

हे सुद्धा वाचा

रेड कार्पेटवर फोटोशूट झाल्यानंतर दीपिका रणवीरकडे पाहतसुद्धा नाही. या दोघांचं एकमेकांशी वागणं पाहून त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची शंका नेटकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘दोघांची देहबोली पूर्णपणे बदलली आहे. कार्यक्रमाच्या आधी त्यांच्यात भांडण झालं की काय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘दीपिका रागात आहे. तिने हात नाही पकडला’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. काहींनी दोघांच्या घटस्फोटाविषयीही शंका उपस्थित केली आहे.

काही दिवसांपूर्वीही रणवीर-दीपिकाच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. चित्रपट समिक्षक उमैर संधू यांनी रणवीर-दीपिकाच्या नात्याबद्दल ट्विट केलं होतं. ‘ब्रेकिंग, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात काही आलबेल नाही’, असं ट्विट त्यांनी केलं. त्यानंतर चाहत्यांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू झाला होता. या चर्चांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता, “आम्ही 2012 मध्ये भेटलो होतो आणि तेव्हापासून डेटिंगला सुरुवात झाली. आमच्या नात्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.” रणवीरने त्याच्या या वक्तव्यातून नात्यातील दुराव्याच्या चर्चांना अप्रत्यक्षपणे फेटाळलं होतं.

रणवीर आणि दीपिकाने 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली. ‘रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.