एनसीबीच्या समन्सनंतर दीपिका सतर्क, चित्रीकरण थांबवलं, 12 वकिलांसोबत सल्लामसलत

एनसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर दीपिकाने तातडीने चित्रपटाचं चित्रीकरण थांबवलं. दीपिकाची सध्या 12 वकिलांसोबत सल्लामसलत सुरु आहे (Deepika Padukone stop shooting after NCB summons).

एनसीबीच्या समन्सनंतर दीपिका सतर्क, चित्रीकरण थांबवलं, 12 वकिलांसोबत सल्लामसलत
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 7:11 PM

मुंबई : एनसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण सतर्क झाली आहे. दीपिका सध्या दिग्दर्शक करण जोहरच्या एका चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचं गोव्यात चित्रीकरण सुरु आहे. मात्र, एनसीबीने समन्स बजावल्यानंतर दीपिकाने तातडीने चित्रीकरण थांबवलं. दीपिकाची सध्या 12 वकिलांसोबत सल्लामसलत सुरु आहे (Deepika Padukone stop shooting after NCB summons).

दीपिकाला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर तिचा पती अभिनेता रणवीर सिंगदेखील चिंतेत पडला आहे. रणवीर सिंगही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दीपिकाच्या संपर्कात असणार आहे. एनसीबीकडून दीपिकाला शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत (Deepika Padukone stop shooting after NCB summons).

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना समन्स

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसात चौघींची चौकशी होणार आहे.

श्रुती मोदी, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांना उद्या (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिकाला शुक्रवार 25 सप्टेंबर, तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना शनिवार 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश आहेत.

दीपिका सध्या गोव्यात चित्रीकरण करत असून, साराही आपल्या आई समवेत गोव्यातील घरी राहत आहे. सारा गोव्यात आई अमृता सिंग सोबत सुट्टी घालवण्यासाठी आली आहे.

या आधीही अनेक वेळा श्रुती मोदीची चौकशी केली गेली आहे. श्रुती मोदी ही रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. श्रुती मोदीच्या या आधीच्या चौकशीच्या आधारावर अभिनेत्रींना प्रश्न उत्तरे केली जाणार आहेत.

एनसीबीच्या हाती पुरावे लागल्याने या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आले आहेत. तत्पूर्वी, एनसीबीने मंगळवारी क्वान या टॅलेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीची सुमारे सहा तास चौकशी केली. यावेळी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातमी :

ड्रग्ज कनेक्शन : दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा, रकुल यांना NCB चे समन्स!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.