Deepika Padukone: कंट्रोल सर! Cannes रेड कार्पेटवर दीपिकाला किस करण्याचा मोह अभिनेत्याला आवरला नाही

| Updated on: May 24, 2022 | 1:22 PM

रेड कार्पेटवरील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की दीपिका रेड कार्पेटवर पोझ देत असताना एक व्यक्ती तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी येतो आणि तिला किस करू लागतो.

Deepika Padukone: कंट्रोल सर! Cannes रेड कार्पेटवर दीपिकाला किस करण्याचा मोह अभिनेत्याला आवरला नाही
Deepika Padukone
Image Credit source: Instagram
Follow us on

75 व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवात (Cannes 2022) अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) परीक्षकपदी निवड करण्यात आली. या महोत्सवात कानच्या रेड कार्पेटवर (Red Carpet) दररोज दीपिकाच्या आकर्षक लूक्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. याच रेड कार्पेटवरील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की दीपिका रेड कार्पेटवर पोझ देत असताना एक व्यक्ती तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी येतो आणि तिला किस करू लागतो. आपण अनकम्फर्टेबल असल्याची भावना पापाराझींसमोर दिसू नये यासाठी ती कॅमेरासमोर हसत पोझ देताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दीपिकाला किस करणारा हा व्यक्ती फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन (Vincent Lindon) आहे. 62 वर्षीय व्हिन्सेंट यांनी 2015 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला होता. यंदाच्या महोत्सवाचा ज्युरी प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हायरल व्हिडीओ-

या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘कंट्रोल सर’ असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर ‘त्यांनी चुकीच्या उद्देशाने तिला किस केलं नाही, फ्रेंच लोकांमध्ये तशी पद्धतच आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं.

2017 मध्ये दीपिकाने या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर पाच वर्षांत आता तिने परीक्षकाचा मान मिळवला आहे. तिच्यासोबत ऑस्कर विजेते असगर फरहादी, जेफ निकोलस, रेबेका हॉल, नूमी रापेस, जास्मिन ट्रिंका, लेडी ली आणि जोशीम ट्रायर या परीक्षकांचा समावेश आहे. कान फिल्म फेस्टिव्हलला इतर सर्व फिल्म फेस्टिव्हल्सचा राजा मानलं जातं. रेड कार्पेट (Red Carpet) हा या फेस्टिव्हलमधील सर्वांत दिमाखदार सोहळा असतो.