AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्थ डे बॉय Salman Khan | रेंज रोवर, ऑडी, बीएमडब्ल्यू जो खेळण्यासारखा वापरतो, वाचा नेमकी संपत्ती किती?

सलमानने आतापर्यंत भरपूर पैसै कमवलेले आहेत. तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. (information Salman khan wealth)

बर्थ डे बॉय Salman Khan | रेंज रोवर, ऑडी, बीएमडब्ल्यू जो खेळण्यासारखा वापरतो, वाचा नेमकी संपत्ती किती?
| Updated on: Dec 27, 2020 | 9:01 AM
Share

मुंबई : जगभरात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा ‘दबंग’ हीरो सलमान खानचा आज वाढदिवस. कोरोना महारमारीच्या पार्श्वभूमीवर त्याने आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं आहे. सलमानने 80 च्या दशकात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मात्र खरं स्टारर्डम त्याला 2008 नंतर मिळालं. (detail information of Salman Khan wealth)

वान्टेड या चित्रपटामुळे सलमान एक अ‌ॅक्शन हीरो म्हणून उदयास आला. त्यानंतर त्याच्या यशाचा आलेख चढताच राहिला. भरपूर प्रसिद्धी मिळाल्यामुळे सलमानच्या जगण्याचा स्तरही बदलला. त्याच्या कमाईमध्येही मोठी वाढ झाली. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी सलमानकडे रांगा लावू लागल्या. सलमाननेच आपल्या उत्पादनांची जाहिरात करावी असा अनेक कंपन्यांचा हट्ट असतो. या सर्व गोष्टींमुळे सलमानने आतापर्यंत भरपूर पैसै कमवलेले आहेत. तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊयात त्याच्याकडे असेलेल्या एकूण प्रॉपर्टीची माहिती.

5 बीएचके फ्लॅट

सलमान खानजवळ गोराई येथे 5 बीएचके फ्लॅट आहे. सलमान खानचे हे घर त्याच्या वांद्रे येथील घरापासून दूर असल्यामुळे तो येथे क्वचितच जातो. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे घर आहे. सलमानच्या या घरात जिम, स्विमिंग पूल आणि एक मिनी सिनेमागृह आहे. हे घर समुद्राच्या काठावर असल्याने त्याची किंमत तब्बल 75 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

पनवेलमध्ये फार्महाऊस

पनवेल येथे त्याच्या मालकीचा एक फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर वेळ घालवणे सलमान खानला आवडते. कित्येक एकरांमध्ये हा फार्महाऊस पसरला असल्याचे सांगितले जाते. या फार्महाऊसची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे.

वांद्रे येथे घर

मुंबईतील महागडा म्हटल्या जाणाऱ्या वांद्रे भागात सलमानचे घर आहे. हे घर छोडे आहे. मात्र, या घराची किंमत 16 कोटी आहे. या घरात त्याच्या आवडीचे कुत्रेही आहेत. सलमानला या कुत्र्यांसोबत वेळ घालायला आवडते.

यॉट

सलमान खानजवळ एक यॉटसुद्धा आहे. समुद्रसफारी करायची असल्यास तो या यॉटचा वापर करतो. या यॉटची किंमत 3 कोटी असल्याचं सांगितलं जातं.

रेंज रोवर

सलमान खान महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. मात्र, सलमानला पांढऱ्या ऱंगाच्या गाड्यांमध्ये सफर करणं आवडतं. सलमान खानकडे एक मर्सिडिज होती. मात्र, त्यांनतर त्याने रेंज रोवर कार घेतली. या कारमधून तो मुंबईत फिरतो. त्याचबरोबर सलमानजवळ बीएमडब्ल्यू X6, ऑडी R8, टोयोटा लैंड क्रूजर, ऑडी RS7, लेक्सस LX470, मर्सिडीज बेंज सारख्या महागड्या कार त्याच्याकडे आहेत.

बिईंग ह्यूमन

सलमान खान बिईंग ह्यूमन नावाचे एक फाउंडेशन चालवतो. त्याच्या या ब्रँडबद्दल सर्वांनाच माहीत आहे. या फाउंडेशनचं भांडवल जवळपास 235 करोड़ रुपये असल्याचं सांगण्यात येतं.

संबंधित बातम्या :

Salman Khan birthday | बॉलिवूडच्या ‘दबंग’चा वाढदिवस यंदा GALAXYवर नाही, मग कुठे झाला साजरा?

Gauahar Khan : रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गौहर खाननं ‘झल्ला-वल्ला’ वर धरला ठेका, डान्स व्हिडीओ व्हायरल

PHOTO | ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचे वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण, ‘डुएट’मध्ये साकारणार ‘आदिती’

(detail information of Salman Khan wealth)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.