Dhanush Aishwarya Divorce : अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट; 18 वर्षानंतर दोघांचाही वेगळं होण्याचा निर्णय

सामंथा प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका पॉवर फूल्ल कपल्सने घटस्फोटाची घोषणा केली आहे.

Dhanush Aishwarya Divorce : अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट; 18 वर्षानंतर दोघांचाही वेगळं होण्याचा निर्णय
Dhanush Aishwarya
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 12:22 AM

चेन्नई: सामंथा प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका पॉवर फूल्ल कपल्सने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अभिनेता धनुष याने सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षानंतर हे दोघेही वेगळे होत आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 18 वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.

2004मध्ये विवाह, दोन मुले

ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा 2004मध्ये विवाह झाला होता. त्यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत. मध्यंतरीही हे दोघे विभक्त होण्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या दोघांनीही मीडियाशी कधीच संवाद साधून या बातम्यांचं खंडन केलं नव्हतं.

मल्टिटॅलेंटेड धनुष

धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष मल्टिटॅलेंटेड आहे. धनुष अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.

धनुष आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी

Kadhal Kondaen या सिनेमाच्या दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सिनेमाच्या निर्मात्याने ऐश्वर्याची धनुष सोबत ओळख करून दिली. ऐश्वर्याने या सिनेमातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केलं होतं. ऐश्वर्याने कामाचं कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनुषने ऐश्वर्याला फुलांचा गुच्छ पाठवला. ऐश्वर्याला धनुषची ही भेट प्रचंड आवडली आणि त्यानंतर दोघं चांगले मित्रं बनले. दोघेही जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ते फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नसायचे. त्यामुळे दोघांचे फोटो वारंवार छापून यायचे. मीडियात दोघेही बातमीचा विषय बनून गेले होते. मात्र, आपल्या नातेसंबंधावर धनुषने कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. ऐश्वर्या आपल्या बहिणीची मैत्रीण आहे असंच ते सांगायचे. मात्र, कालांतराने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीची अधिकृत माहिती समोर आली. 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अख्खी साऊथची फिल्म इंडस्ट्री हजर होती.

संबंधित बातम्या:

John Abraham Fees : जॉनने या चित्रपटासाठी घेतले इतके कोटी रूपये, अवघ्या बॉलिवूडमध्ये चर्चा

Samantha: विश्वास नाही बसणार! समंथाने ‘पुष्पा’ मधल्या तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी घेतले तब्बल इतके कोटी

अपशब्द वापरला त्यावेळी मला थोबडायला हवं होतं, मानेंचा सहकलाकारांना सवाल

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.