Hema Malini | ‘मी हेमाच्या जागी असती तर…’, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने व्यक्त केली खंत

'हेमा यांच्या नात्याला मी परवानगी...', हेमा - धर्मेंद्र यांच्या लग्नाबद्दल पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र देओल कुटुंबाची चर्चा...

Hema Malini | 'मी हेमाच्या जागी असती तर...', धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने व्यक्त केली खंत
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 3:47 PM

मुंबई | अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांचा मुलगा करण देओल (Karan Deol) याने १८ जून रोजी गर्लफ्रेंड द्रिशा अचार्य हिच्यासोबत लग्न केलं आहे. करण देओल याच्या लग्नानिमित्त संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं. करण देओल याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. करण देओल याच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. अनेकांनी लग्नात येवून नव्या जोडप्याला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. लग्नासोहळ्यात धर्मेंद्र यांचा पहिल्या पत्नीसोबत देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण करण आणि द्रिशा यांच्या लग्नात अभिनेते धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब म्हणजे हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या..

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं असलं तरी, धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिलेला नाही. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं होतं, तेव्हा प्रकाश कौर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाची सुरुवात ‘तुम हसीन मैं जवान’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. तेव्हा दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं.

जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र सुरु होत्या, तेव्हा धर्मेंद्र विवाहित असून चार मुलांचे वडील होते. अशात जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी दुसरं लग्न केलं, तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती. पतीने दुसरं लग्न केल्यानंतर प्रकाश कौर यांनी एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती…

हे सुद्धा वाचा

प्रकाश कौर म्हणाल्या होत्या की, ‘धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर त्यांना अनेकजण स्त्रीलंपट म्हणू लागले होते. कोणी माझ्या पतीला असं का म्हणू शकतं? जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी असंच केलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि ते दुसरं लग्न करत आहेत…’

पुढे प्रकाश कौर म्हणाल्या, ‘धर्मेंद्र चांगले पती होवू शकले नाहीत. पण माझ्यासाठी ते प्रचंड चांगले होते.. ते एक उत्तम वडील आहेत. मुलं त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. धर्मेंद्र मुलांना कधीही विसरु शकत नाहीत. हेमा कोणत्या परिस्थितीत असतील ही गोष्ट मी समजू शकतो. पण मी हेमा यांच्या जागी असती असं कधीही केलं नसतं.. मी त्यांना समजू शकते. मी देखील एक पत्नी आणि एक आई आहे… पण मी धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याला कधीही परवानगी देणार नाही..’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या…

धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत..

'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.