हेमा मालिनी यांच्या ‘या’ कामाला धर्मेंद्र यांचा विरोध, 10 वर्षांनंतर अखेर सत्य समोर
Dharmendra - Hema Malini | हेमा मालिनी यांच्याबद्दल धर्मेंद्र यांच्या मनात होती असुरक्षितता... अभिनेत्रीच्या 'या' कामासाठी होता त्यांचा विरोध, तब्बल 10 वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र - हेमा मालिनी यांच्या नात्याची चर्चा...
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी फक्त अभिनय क्षेत्रातच नाहीतर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचा ठसा उमटवला आहे. सध्या हेमा मालिनी त्यांच्या रजकीय करियरमुळे चर्चेत आहेत. हेमा यंदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्या तिसऱ्यांदा मथुरेतून निवडणूक लढवत आहेत. हेमा मालिनी 2014 पासून राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, आता 10 वर्षे राजकारणात योगदान दिल्यानंतर हेमा मालिनी यांनी खुलासा केला आहे की, पती धर्मेंद्र यांना पत्नीने राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. तर विनोद खन्ना यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि राजकारणात येण्यास प्रवृत्त केलं आणि योग्य मार्ग दाखवला.
नुकताच झालेल्या एक मुलाखतीत हेमा मालिनी यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘धर्मेंद्र यांना मी राजकारणात प्रवेश करणार असल्याचा निर्णय मान्य नव्हता. निवडणुकीसाठी उभी नको राहून, हा प्रवास अत्यंत कठीण आहे.. असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्यांनी हे सांगितल्यावर मी ते आव्हान म्हणून घेतलं.’
‘जेव्हा धर्मेंद्र राजकारणात आले तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यांना सतत प्रवास करावा लागत होता. शिवाय त्यांना सिनेमांमध्ये देखील काम करायचं होतं. त्यामुळे राजकारण त्यांना फार कठीण वाटतं होतं. ते माझ्यासाठी चिंतेत होते. कारण त्यांना अनुभव होता…’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘तुम्ही फिल्मस्टार असाल आणि राजकारणात प्रवेश करत असाल तर लोकांमध्ये तुमची क्रेझ फार असते. चाहत्यांमध्ये धर्मेंद्र यांची असलेली क्रेझ तर सर्वांना माहिती आहे. या सर्व गोष्टी संभाळणं फार कठीण असतं. मी देखील अनेक संकटांचा सामना केला आहे. धर्मेंद्र यांना मी राजकारणात असलेलं बिलकूल आवडत नाही. पण मी एक महिला आहे, सर्वकाही योग्य प्रकारे सांभाळू शकते..’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला विनोद खन्ना यांच्याकडून प्रेरणा मिळाली कारण त्यांनी मला त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी सोबत नेलं होतं. भाषण कसं करायचं, जनतेला कसं सामोरं जायचं, त्यांनी मला खूप काही शिकवलं होतं. 5000-6000 लोकांमध्ये भाषण देणं फार कठीण काम आहे. पहिल्यांदा तुम्हाला भीती वाटते.’ सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांची चर्चा सुरु आहे.
धर्मेंद्र यांचा राजकीय प्रवास
अभिनेते धर्मेंद्र 2004 ते 2009 पर्यंत बिकानेरचे खासदार होते. मात्र, त्यांना राजकारण फारसे आवडत नसल्याने त्यांनी हा प्रवास तिथेच सोडला. तर हेमा मालिनी आजही राजकारणात स्वत:चं नाव कमावत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हेमा मालिनी राजकारणात सक्रिय आहेत.