Dhwani Bhanushali | ध्वनि भानुशालीच्या ‘नयन’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

या गाण्यामध्ये महाविघालयामधील प्रेम दाखवण्यात आले आहे. याबद्दल ध्वनी म्हणते की, नयन हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. विश्वास ठेवणे आणि हार कधीही न स्विकारणाऱ्यांसाठी हे गाणे आधारित आहे.

Dhwani Bhanushali | ध्वनि भानुशालीच्या 'नयन' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 6:25 PM

मुंबई : वास्ते गाण्याच्या जबरदस्त यशानंतर आता ध्वनि भानुशाली आपले आणखीन एक नवीन गाणे घेऊन आली आहे. तिच्या नयन या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  मनोज मुंतशिर यांनी हे गाणे लिहले आहे तर गाण्याला संगीत डीजे चेतस आणि लिजो जॉर्ज यांनी दिले आहे.(Dhwani Bhanushali’s new song Nayan)

या गाण्यामध्ये महाविघालयामधील प्रेम दाखवण्यात आले आहे. याबद्दल ध्वनी म्हणते की, नयन हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. विश्वास ठेवणे आणि हार कधीही न स्विकारणाऱ्यांसाठी हे गाणे आधारित आहे. 2020 हे सर्वांसाठी अवघड वर्ष होते, सर्वांनीच या वर्षात संघर्ष केला आहे. मात्र, 2020 ला निरोप देण्याचा आणि आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न मी या गाण्यातून करत आहे. भूषण कुमार म्हणतात, “आम्ही असे संगीत बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल. ध्वनी एक चांगली गायक आहे, तरूण वर्ग नेहमीच तिची प्रशंसा करत असतो. आम्ही तिला बर्‍याच वर्षांपासून नवीन उंचींना स्पर्श करताना पाहिले आहे. राधिका विनय म्हणते की, जेव्हा मी नयन हे गाणे ऐकले त्यावेळी मला माझे महाविघालयातील दिवसांची आठवण झाली.

गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.  त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पण जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक (हक्काच्या) भाषेत असतील तर…?  प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील. हा मुद्दा अधोरेखित करण्यामागचा उद्देश असा आहे की, मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे.

प्ले स्टोअरवर नऊ लाखांहून अधिक पसंती मिळालेल्या ‘लेटसअप’ या इन्फोटेनमेंट व न्यूज अॅपच्या प्रचंड यशानंतर सुप्रसिद्ध उद्योजक, ‘महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष, निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियो फाऊंडर/ संस्थापक राहुल नार्वेकर त्यांच्या ‘लेट्सफ्लिक्स’ या नव्या मराठी ओटोटीच्या निमित्ताने OTT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच ‘लेटसअप’ या अ‍ॅपला AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge अंतर्गत ‘आत्मनिर्भर अ‍ॅप पुरस्कार’ मिळाला. ओटीटीसाठी असलेली पसंती लक्षात घेता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी देखील त्यांच्या हक्काचं ओटीटी माध्यम मराठीमध्ये घेऊन येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

संबंधित बातम्या :

Ira Khan | अमिर खानच्या लेकीचा बोल्ड लुक तुम्ही पाहिला का?

Deepika Padukone | दीपिका पादुकोणला ‘तापसी पन्नूचा बिकिनी शूट’ आवडला म्हणाली…

(Dhwani Bhanushali’s new song Nayan)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.