AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिया मिर्झा पुन्हा लग्नबंधनात अडकणार, मुहूर्तही ठरला!

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) अभिनयामुळे ओळखली जाते. दियाने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दिया मिर्झा पुन्हा लग्नबंधनात अडकणार, मुहूर्तही ठरला!
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 7:22 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) अभिनयामुळे ओळखली जाते. दियाने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दियाने करिअरची सुरुवात रहना है तेरे दिल में मधून केली होती. दिया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा प्रियकर आणि व्यवसाय भागीदार साहिल सिंघाशी लग्न केले होते. दोघांनी दिल्लीत आर्य-समाजच्या रूढीनुसार अगदी साधा पद्धतीने लग्न केले होते. (Dia Mirza is set to remarry on February 15)

दिया मिर्झा आणि साहिल सिंघा लग्नापूर्वी 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, दिया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आली आहे. 2019 मध्ये तिने साहिल सिंघासोबत घटस्फोट घेऊन सर्वांना धक्काच दिला होता. साहिल सिंघापासून विभक्त झाल्यानंतर दीया मिर्झाने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘आयुष्याची 11 वर्षे एकत्र घालवल्यानंतर आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मित्र होतो आणि हे संबंध प्रेम व आदराने एकमेकांशी सुरूच ठेवत आहोत. आमचे पुढचे आयुष्य वेगळे असले तरी आम्ही एकमेकांशी असलेल्या संबंधाबद्दल कायमच आभारी आहोत.

त्यानंतर तिचे नाव बिजनेसमॅन वैभव रेखीसोबत सोडले गेले होते. ते दोघे गेल्या अनेक दिवसांपासून डेट देखील करत होते. मात्र, दोघांनाही त्यांच्या नात्यासंदर्भात कोणतेही भाष्य केले नव्हते पण आता 15 फेब्रुवारीला दिया मिर्झा आणि वैभव रेखी लग्नबंधणात अडकणार आहेत. मुंबईमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. वैभव रेखा हा वांद्रे येथील पाली हिल भागात राहतो.

तो सुप्रसिद्ध योग प्रशिक्षका सुनैना रेखीचा पती होता. तसेच सुनैना आणि वैभव यांची एक मुलगी देखील आहे.  दिया मिर्झा हिने थप्पड चित्रपटातील जबरदस्त अभिनय केला आहे. 2004 मध्ये दीया मिर्झाने विधु विनोद चोप्राच्या परिणीता या चित्रपटात काम केले होते. यानंतर, 2006 मध्ये, ती पुन्हा संजय दत्तसोबत मुन्ना भाई चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने बर्‍याच चित्रपटामध्ये काम केले होते. यासह दिया मिर्झाने वेबसाइट ‘काफिर’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली तिची हे भूमिका चाहत्यांना देखील आवडली होती दियाच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होती.

संबंधित बातम्या : 

दीपिका पादुकोणचा पारा चढला, नेटकऱ्याने ट्रोल करताना वापरली शिवी आणि…

मॉडल रेबेका लँड्रिथची निर्घृण हत्या, गळा, डोके आणि छातीवर 18 गोळ्या झाडल्या, मारेकऱ्यांकडून मृतदेहाची विटंबना

…आणि प्रियांका चोप्रा ॲमेझॉनवर ठरली Best Seller, भारतासह UK आणि US ‘या’ पुस्तकाची धमाल

(Dia Mirza is set to remarry on February 15)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.