Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्मात्यांकडून बदलला जाणार ‘बिग बॉस 17’चा विजेता? काय म्हणतायत सध्याचे वोटिंग ट्रेंड्स?

बिग बॉसच्या सतराव्या सिझनचा विजेता अवघ्या काही दिवसांनी घोषित होणार आहे. त्यापूर्वीच सोशल मीडियावर विजेत्याच्या नावावरून विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. बिग बॉसच्या घरात सध्या पाच स्पर्धक राहिले आहेत. या पाच जणांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे.

निर्मात्यांकडून बदलला जाणार 'बिग बॉस 17'चा विजेता? काय म्हणतायत सध्याचे वोटिंग ट्रेंड्स?
bigg boss 17 top 5 contestantsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 10:55 PM

मुंबई : 24 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच सोशल मीडियावर विजेत्याच्या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी सलमान खानच्या या शोचा ग्रँड फिनाले अत्यंत धूमधडाक्यात पार पडणार आहे. त्यापूर्वी वोटिंग ट्रेंड्स काय म्हणतायत, प्रेक्षकांना कल कोणत्या स्पर्धकाला आहे याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात पाच स्पर्धक राहिले आहेत. अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार या पाच जणांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे.

‘बिग बॉस 17’च्या सुरुवातीपासूनच स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रँड फिनालेपूर्वी त्याचं नाव सोशल मीडियावर विजेतेपदासाठी जोरदार चर्चेत आहे. एक्सवर (ट्विटर) एका दिवसात मुनव्वरच्या नावाने लाखो ट्विट्स केले जात आहेत. मात्र ऐनवेळी बिग बॉसकडून विजेता बदलला जाणार असल्याचा अंदाज आहे. सोशल मीडियावर मुनव्वर जोरदार ट्रेंड होत असला तरी तो विजेता ठरणार नाही, असं कळतंय. त्याऐवजी अंतिम चुरस ही मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे या दोघींमध्ये रंगणार असल्याचं समजतंय. या दोघींपैकीच कोणीतरी एक विजेता ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर मुनव्वर फारुकी हा रनर-अप ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा

आणखी एका वोटिंग ट्रेंडनुसार सध्या टॉप 3 मध्ये मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा यांची नावं चर्चेत आली आहेत. यातून अंकिता लोखंडेचा पत्ता कट झाल्याचं दिसतंय. मात्र सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अंकिताला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय.

बिग बॉसच्या घरातून नुकताच विकी जैन बाहेर पडला. जवळपास 100 दिवसांनंतर विकी जैनचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. विकीच्या एलिमिनेशननंतर आता ग्रँड फिनालेमध्ये फक्त पाच स्पर्धक पोहोचले आहेत. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा या पाच जणांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. विकीच्या एलिमिनेशननंतर अंकिताला अश्रू अनावर झाले.

एलिमिनेशनची प्रक्रिया सुरू होताच सर्वांत आधी अभिषेक कुमार आणि त्यानंतर मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी हे पहिले तीन स्पर्धक फायनलिस्ट ठरले. त्यानंतर बिग बॉसने अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना चिठ्ठ्या उचलायला सांगितलं. विकीने जेव्हा चिठ्ठी उघडली, तेव्हा त्यावर ‘एव्हिक्टेड’ (बाद) असं लिहिलेलं होतं. हे पाहिल्यानंतर अंकिताला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. विकीने घरातील प्रत्येक सदस्याला मिठी मारली आणि त्यावेळी अंकिताला अश्रू अनावर झाले.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.