सोनाली बेंद्रेला पाहताच जया बच्चन यांनी फिरवलं तोंड? व्हिडीओवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीतील जया बच्चन आणि सोनाली बेंद्रे यांचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला, तेव्हा नेटकऱ्यांनी खूप टीका केली होती. जया बच्चन या नेहमीच इतरांशी उद्धटपणे वागतात, असं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने जया बच्चन यांचा बचाव केला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच फोटोग्राफर आणि पापाराझींसमोर भडकलेल्या दिसून येतात. एखाद्या दिवशी जर त्या पापाराझींसमोर हसत आल्या, तर तो दिवस सर्वांसाठी खूप नशीबवान मानला जातो. केवळ पापाराझी किंवा फोटोग्राफर्ससोबतच नाही तर कधी कधी इंडस्ट्रीतल्या कलाकारांसमोरही जया बच्चन यांचा राग अनावर होतो. असाच एक किस्सा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये घडला होता. NMACC याठिकाणी आयरा खान आणि नुपूर शिखऱे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. जया बच्चनसुद्धा मुलगी श्वेता नंदासोबत याठिकाणी पोहोचल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या मागे अभिनेत्री सोनाली बेंद्रे उभी होती. सोनाली पुढे येताच जया बच्चन तिला दुर्लक्ष करत तिथून निघून गेल्या, अशी चर्चा त्यावेळी होती. त्यावर आता सोनालीने प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, हे सोनालीने ‘आयदिवा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. “जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाता, तेव्हा तिथे पापाराझींची संपूर्ण आर्मीच उभी असते. फोटोसाठी तुम्ही कुठे उभं राहायचं, हे कळावं म्हणून टेप्स लावलेल्या असतात. आम्ही पहिल्या जागी थांबलो, उभे राहिलो तेव्हा काहींनी म्हटलं की त्यांना माझा सोलो फोटो हवा आहे. तोपर्यंत त्या पुढच्या मार्कजवळ जात होत्या आणि तितक्यात लोकांनी अर्थ काढला की मी येताच जया बच्चन तिथून निघून गेल्या. पण खरंतर त्या एका टेपच्या खुणेवरून दुसऱ्या खुणाकडे जात होत्या. जया बच्चन खरंच स्वभावाने खूप प्रेमळ आहेत. पण काही लोकांना त्यांच्या स्वभावावरून मुद्दाम टीका करायची असते”, असं सोनाली म्हणाली.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
आयराच्या रिसेप्शनमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. जया बच्चन यांनी सोनालीला जाणूनबुजून दुर्लक्ष केलं, असं काहींनी म्हटलं. तर काहींनी जया यांची बाजू घेतली. सोनालीचे फोटो काढता यावेत, म्हणून त्या तिथून निघाल्या, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं होतं.