Bigg Boss OTT 2 | रागाच्या भरात सलमानने सोडला ‘बिग बॉस ओटीटी 2’ शो? नेमकं काय आहे कारण?

सलमान खान गेल्या बऱ्याच वर्षांपासून या शोचं सूत्रसंचालन करतोय. त्याल बिग बॉस या शोचा सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक मानलं जातं. मात्र अनेकदा स्पर्धकांना त्याच्यावर पक्षपातीचाही आरोप केला आहे. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडलेल्या काही स्पर्धकांनी सलमानवर बरेच आरोप केले होते.

Bigg Boss OTT 2 | रागाच्या भरात सलमानने सोडला 'बिग बॉस ओटीटी 2' शो? नेमकं काय आहे कारण?
सलमान खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 4:30 PM

मुंबई | 18 जुलै 2023 : बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केलं होतं. मात्र ओटीटीवरील हा पहिला सिझन तितका गाजला नव्हता. म्हणून या शोच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिझनसाठी सूत्रसंचालक म्हणून सलमान खानला निवडलं. सलमानमुळे बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन पहिल्या एपिसोडपासूनच चर्चेत आला. म्हणून हा शो दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. मात्र आता काही दिवसांतच सलमानने हा शो सोडल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. ‘बिग बॉस ओटीटी 2’मधील वीकेंड का वार या एपिसोड्सचं सूत्रसंचालन सलमान करतो. मात्र गेल्या वीकेंडला सलमानऐवजी कॉमेडियन कृष्णा अभिषेक या शोचं सूत्रसंचालन करताना दिसला. सलमान त्याच्या आधीच्या काही कामांमुळे त्या आठवड्यात बिग बॉसमध्ये दिसू शकला नाही, असं तेव्हा म्हटलं गेलं. मात्र आता त्यामागचं दुसरंच कारण समोर येत आहे.

गेल्याच्या गेल्या आठवड्यात जेव्हा वीकेंड का वार हा खास एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात सिगारेट पहायला मिळाली. यावरूनच सलमान बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमवर जोरदार भडकला होता, असं कळतंय. याच कारणामुळे त्याने शो सोडल्याचंही म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर सलमान फक्त ओटीटी व्हर्जन नाही तर टीव्ही व्हर्जनवरील बिग बॉसचंही सूत्रसंचालन करणार नसल्याचं समजतंय.

बिग बॉस खबरी या सोशल मीडिया पेजवर बिग बॉससंबंधित सर्व अपडेट पोस्ट केले जातात. या पेजने सलमान शो सोडण्याविषयीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सलमान हा शो सोडण्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. पुढील आठवड्यात तो पुन्हा शोमध्ये दिसणार’, असं ट्विट या पेजवर करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सलमान खान गेल्या बऱ्याच वर्षांपासून या शोचं सूत्रसंचालन करतोय. त्याल बिग बॉस या शोचा सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक मानलं जातं. मात्र अनेकदा स्पर्धकांना त्याच्यावर पक्षपातीचाही आरोप केला आहे. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडलेल्या काही स्पर्धकांनी सलमानवर बरेच आरोप केले होते. त्यानंतर त्याचा हातात सिगारेट असलेला फोटोही व्हायरल झाला होता. या सर्व कारणांमुळे नाराज झालेल्या सलमानने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे या चर्चांचं उत्तर आता प्रेक्षकांना येत्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्येच मिळणार आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.