प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी पंजाबच्या (Punjab) मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या शरीरात अनेक गोळ्या शिरल्याचं मानसाचे पोलीस उपाधीक्षक गोबिंदर सिंग यांनी सांगितलं. सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याचं एक गाणं सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड होऊ लागलं आहे. ‘द लास्ट राइड’ (The Last Ride) हे गाणं सिद्धूचे चाहते आणि फॉलोअर्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या वर्षी 15 मे रोजी सिद्धूचं हे गाणं प्रदर्शित झालं होतं आणि त्याला युट्यूबवर 11 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं आणि सिद्धूच्या मृत्यूची परिस्थिती यांच्यात विचित्र साम्य असल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय.
सिद्धूचं हे गाणं रॅपर तुपाक शकुरला आदरांजली असल्याचं म्हटलं जातंय. 1996 मध्ये 25 वर्षीय तुपाकची गोळ्या झाडून हत्या झाली होती. सिद्धू मूसेवालाचीही अशाच पद्धतीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ‘हो चोब्बार दे चेहरे उत्ते नूर दसदा, नी एहदा उठूगा जवानी च जनाजा मिठिये’, या त्याच्या गाण्याच्या ओळी आहेत. ‘तरुण मुलाच्या चेहऱ्यावरील तेज हेच सांगतंय की त्याला तरुणपणीच मृत्यूला सामोरं जावं लागेल’, अशा आशयाचे हे बोल आहेत. अनेकांनी यावरून त्याच्या मृत्यूच्या परिस्थितीत विचित्र साम्य असल्याचं म्हटलं आहे. ‘द लास्ट राईट’ हे त्याचं गाणं होतं आणि खऱ्या आयुष्यातही त्याचा शेवटचा प्रवास ठरला, असं एकाने म्हटलंय. तर काहींनी त्याच्या गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या आहेत.
This was sidhu moosewala last released song – THE LAST RIDE
the cover is similiar to the way he was shot. #sidhumoosewala #TheLastRide pic.twitter.com/sj5DY5ObYr
— faisal_fasi (@tweets_by_fasi) May 29, 2022
Ni Ehda Uthuga Jawani Ch Janaja Mithiye. Its all about dying young #Thelastride #sidhumoosewala #Sohigh #tothesky
Rest in Peace G
— اسداللہ نجم (@AsadNajam5879) May 29, 2022
The fact that “the last ride” was released two weeks ago . Life is so unpredictable man? #siddhumoosewala r.i.p legend #thelastride we want justice for him ?this death is literally shocking ?? pic.twitter.com/7ngzUG0Hnd
— Khyati Arya (@khyati_x) May 29, 2022
सिद्धूला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती मानसाचे सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी पत्रकारांना दिली. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धूने मानसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ‘आप’चे डॉ. विजय सिंगचा त्याने पराभव केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी मूसेवालाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.