मराठी सिनेसृष्टीतील अस्सल सोनं..; ‘संत ज्ञानेश्वराची मुक्ताई’चा टीझर पाहून भारावले प्रेक्षक

मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचं नातं विलक्षण होतं. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची, कधी बहीण, तर कधी शिष्या बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केलं, तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केला.

मराठी सिनेसृष्टीतील अस्सल सोनं..; 'संत ज्ञानेश्वराची मुक्ताई'चा टीझर पाहून भारावले प्रेक्षक
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 9:36 AM

शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।। असं या भावंडांचं वर्णन संत कान्होपात्रांनी केलंय. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.

महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि त्या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेलं नव्हतं तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या दिव्यातून जावं लागलं होतं. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली. देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य आणि विचारांचे सार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. या चित्रपटाची प्रस्तुती ए. ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे सुद्धा वाचा

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचं आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचं आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिलं आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.