बिपाशा बासूवरून जॉन अब्राहमसोबत होतं भांडण? बऱ्याच वर्षांनंतर डिनो मोरियाकडून खुलासा

अभिनेत्री बिपाशा बासूने एकेकाळी अभिनेता डिनो मोरिया आणि जॉन अब्राहम यांना डेट केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डिनो मोरिया जॉनसोबतच्या भांडणाविषयी व्यक्त झाला. बऱ्याच वर्षांनंतर त्याने या भांडणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

बिपाशा बासूवरून जॉन अब्राहमसोबत होतं भांडण? बऱ्याच वर्षांनंतर डिनो मोरियाकडून खुलासा
Dino Morea, Bipasha Basu and John AbrahamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 9:48 AM

अभिनेता जॉन अब्राहम आणि डिनो मोरिया यांनी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर चित्रपटांकडे मोर्चा वळविला. या दोघांमध्ये कायम वाद होता, असं म्हटलं जायचं. अभिनेत्री बिपाशा बासूनेही मॉडेलिंगपासूनच करिअरची सुरुवात केली होती. बिपाशामुळे जॉन आणि डिनो यांच्यात वाद निर्माण झाले, अशी त्यावेळी खूप चर्चा होती. आता बऱ्याच वर्षांनंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डिनोने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. जॉन आणि माझ्यात कोणताच वाद नाही, आम्ही आजही चांगले मित्र आहोत, असं त्याने स्पष्ट केलं. या मुलाखतीत डिनो बिपाशासोबतच्या नात्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत डिनो म्हणाला, “आमच्यात कधीच वैर नव्हतं. आम्ही एकमेकांशी बोलायचो आणि मजामस्ती करायचो. बिपाशासोबत माझं ब्रेकअप झाल्यानंतर आणि जॉन तिला डेट करू लागल्यानंतर लोकांनीच असं ठरवलं की माझ्यात आणि जॉनमध्ये वाद आहे. हा वाद फक्त लोकांच्या डोक्यातच होता. लोकांना असं वाटलं की त्याने माझ्या गर्लफ्रेंडला हिसकावून घेतलं, त्यामुळे मी त्याच्यावर नाराज होतो. माध्यमांनीही या चर्चांदरम्यान आगीत तेल ओतण्याचं काम केलं. पण आमच्यात खरंच काही वाद नव्हता. आम्ही दोघं आपापल्या मार्गाने काम करत होतो. किंबहुना मी कालच त्याला मेसेज केला की आपण बाइक राइड किंवा कॉफी प्यायला जाऊया का? त्यामुळे आमच्यात वाद आहे, या चर्चा खोट्या आहेत. ज्यावेळी आम्ही अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा लोक म्हणायचे की मॉडेल अभिनय करू शकत नाही. पण जॉन आणि मी हे चुकीचं ठरवलं. जॉन आज करिअरमध्ये ज्याठिकाणी आहे, ते पाहून मला खूप आनंद होतो. त्याने खूप चांगली प्रगती केली.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Dino Morea (@thedinomorea)

बिपाशासोबतच्या अफेअरविषयीही तो या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. “मी बऱ्याच वर्षांनंतर हे स्पष्ट करतोय. माझं आणि बिपाशाचं ब्रेकअप झाल्याच्या वर्षभरानंतर ते दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. त्यावेळी मीसुद्धा दुसऱ्या मुलीला डेट करत होतो. त्यामुळे आमच्यात वाद कसा असेल? लोकांना असं वाटलं की जॉनने माझ्या गर्लफ्रेंडला हिसकावून घेतलं. पण असं काहीच नव्हतं. आम्ही तिघं एकमेकांशी बोलायचो पण लोकांनी वेगळाच अर्थ काढला”, असं तो पुढे म्हणाला.

बिपाशासोबतच्या नात्याबद्दल त्याने सांगितलं, “ती कोलकाताची होती आणि मी बेंगळुरूचा आहे. एका मित्राद्वारे आमची एकमेकांशी ओळख झाली होती. माझ्या मित्राने माझ्यासाठी ब्लाइंड डेट ठरवली होती. मला फक्त त्यावेळी इतकंच माहित होतं की ती एक सुपरमॉडेल आहे. मीसुद्धा त्यावेळी सुपरमॉडेल होतो. आम्ही दोघं ब्लाइंड डेटवर गेलो होतो. त्यावेळी हे थोडं विचित्र वाटलं होतं पण त्यानंतर लगेच आम्ही एकमेकांना डेट करू लागलो होतो. आम्हा दोघांच्याही करिअरची सुरुवात होती, त्यामुळे सुरुवातीला सर्वकाही चांगलं होतं. ‘राज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमचं ब्रेकअप झालं होतं. ती वेळ आमच्यासाठी खूप कठीण होती. त्यानंतरही आम्ही ‘गुनाह’ चित्रपटात काम केलं. पण ब्रेकअपनंतर एकत्र काम करणं खूपच कठीण होतं.” या मुलाखतीत डिनोने अभिनेत्री लारा दत्तालाही काही काळासाठी डेट केल्याचं सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.